अहिल्यानगर
राहुरी येथील निसर्ग उपचार केंद्रामध्ये कोणतीच अधिकृत वैद्यकीय नोंदणी नसताना रुग्णांवर उपचार केल्याप्रकरणी एका मुन्नाभाई डॉक्टरच्या विरोधात राहुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. राहुरी शहरातील तन्वीर देशमुख हा गॅलेक्सी केंद्राच्या माध्यमातून रुग्णावर उपचार करत होता मात्र त्याच्याकडे महाराष्ट्र कौन्सिलिंग ऑफ मेडिसिन अथवा नॅशनल कौन्सिलिंगची अधिकृत नोंदणी नसल्याचे तपसात समोर आले आहे. वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी आवश्यक असणारे प्रमाणपत्र नसतानाही सदर मुन्नाभाई तन्वीर हा रुग्णांवर उपचार करत असल्याचे निदर्शनात आले होते. याप्रकरणी राहुरी ग्रामीण रुग्णालयाचे अधिकारी डॉक्टर गणेश मिसाळ यांनी राहुरी पोलिसात फिर्याद दाखल केली होती त्यानुसार पोलिसांनी संबंधित मुन्नाभाई डॉक्टर वर गुन्हा नोंदवून त्यास अटक केली होती.या प्रकरणी आता तन्वीर हरून यास राहुरी येथील न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

तन्वीर देशमुख याच्यावर 12 मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्यात तन्वीर हरुन यास अटक करून राहुरी येथील न्यायालायत १९ मे रोजी हजर करण्यात हजर करणयात आले होते.तर तन्वीर याच्या जमीन अर्जावर आज न्यायालयाने निकाल दिला असून तन्वीर हरुन यास अटी व शर्ती वर जामीन मंजूर करण्यात आला असून आरोपी तन्वीर हरुन याच्या वतीने न्यायालयात अँडव्होकेट महेश तवले , संजय दुशिंग , संजय वालेकर असिफ शेख यांनी काम पाहिले होते.





