अहिल्यानगर दिनांक २४ मे
अहिल्यानगर मध्ये प्रभाग क्रमांक पाचचे नगरसेवक मोहित पंजाबी यांच्यावतीने हॉटेल संजोग या ठिकाणी दहावी आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आणि दहावी बारावीनंतर कोणते करिअर करावे यासाठी प्रसिद्ध करियर मार्गदर्शक सीए शबनम धुप्पड यांचे करिअर मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला आमदार संग्राम जगताप प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. दहावी आणि बारावी पास झाल्यानंतर विद्यार्थ्यांना कोणत्या क्षेत्रात प्रवेश करावा याचे प्रश्नचिन्ह विद्यार्थ्यांबरोबरच पालकांनाही असते त्यामुळे अनेक वेळा करिअर करताना थोडीही चूक संपूर्ण आयुष्यामध्ये अंधार निर्माण करते त्यासाठी दहावी बारावीला विद्यार्थी आणि पालकांनी योग्य ठिकाणी प्रवेश घेतला तर विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्वल होते. नगरसेवक मोहित पंजाबी यांनी विकासाबरोबर पुढच्या पिढीचे भविष्य घडवण्यासाठी सुरू केलेले करिअर मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांचा सन्मान हा निश्चितच विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा टप्पा असल्याचं आमदार संग्राम जगताप यांनी आपल्या भाषणात सांगितले.

तर यापुढे दरवर्षी दहावी आणि बारावी मध्ये चांगले मार्क घेऊन उत्तीर्ण होणाऱ्या मुलींसाठी स्वर्गीय आमदार अरुण काका जगताप यांच्या नावाने पुरस्कार देणार असल्याची घोषणा नगरसेवक प्रदीप पंजाबी यांनी केली आहे. या कार्यक्रमाला प्रभाग क्रमांक पाचचे नगरसेवक जितू गंभीर त्यांच्यासह प्रभागातील सर्व ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.





