Homeविशेषविकासा पासून ते अहिल्यानगराची पुढची पिढी घडवण्याकरीता सुरू असलेली मोहित पंजाबी यांची...

विकासा पासून ते अहिल्यानगराची पुढची पिढी घडवण्याकरीता सुरू असलेली मोहित पंजाबी यांची धडपड कौतुकास्पद – आ. संग्रामभैय्या जगताप नगरसेवक मोहित पंजाबी यांच्या वतीने प्रभाग क्रमांक पाच मधील सर्व दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचाभव्य सत्कार आणि मार्गदर्शन शिबिर संपन्न…

advertisement

अहिल्यानगर दिनांक २४ मे
अहिल्यानगर मध्ये प्रभाग क्रमांक पाचचे नगरसेवक मोहित पंजाबी यांच्यावतीने हॉटेल संजोग या ठिकाणी दहावी आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आणि दहावी बारावीनंतर कोणते करिअर करावे यासाठी प्रसिद्ध करियर मार्गदर्शक सीए शबनम धुप्पड यांचे करिअर मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला आमदार संग्राम जगताप प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. दहावी आणि बारावी पास झाल्यानंतर विद्यार्थ्यांना कोणत्या क्षेत्रात प्रवेश करावा याचे प्रश्नचिन्ह विद्यार्थ्यांबरोबरच पालकांनाही असते त्यामुळे अनेक वेळा करिअर करताना थोडीही चूक संपूर्ण आयुष्यामध्ये अंधार निर्माण करते त्यासाठी दहावी बारावीला विद्यार्थी आणि पालकांनी योग्य ठिकाणी प्रवेश घेतला तर विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्वल होते. नगरसेवक मोहित पंजाबी यांनी विकासाबरोबर पुढच्या पिढीचे भविष्य घडवण्यासाठी सुरू केलेले करिअर मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांचा सन्मान हा निश्चितच विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा टप्पा असल्याचं आमदार संग्राम जगताप यांनी आपल्या भाषणात सांगितले.

Oplus_0

तर यापुढे दरवर्षी दहावी आणि बारावी मध्ये चांगले मार्क घेऊन उत्तीर्ण होणाऱ्या मुलींसाठी स्वर्गीय आमदार अरुण काका जगताप यांच्या नावाने पुरस्कार देणार असल्याची घोषणा नगरसेवक प्रदीप पंजाबी यांनी केली आहे. या कार्यक्रमाला प्रभाग क्रमांक पाचचे नगरसेवक जितू गंभीर त्यांच्यासह प्रभागातील सर्व ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular