अहिल्यानगर दिनांक २१ जून
खुनाच्या प्रकरणात आरोपीस जामीन मंजूर जानेवारी महिन्यात पिकअप वाहनाने धडक देऊन संदीप लगड यांचा खून केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या आरोपी ऋषिकेश बाळासाहेब घिगे यास अहिल्यानगरच्या जिल्हा व सत्र न्यायालय यांनी जामीन मंजूर केला असून आरोपींच्या वतीने अॅड. अक्षय शिंदे, अॅड, संकेत गर्जे यांनी न्यायालय मध्ये जामीन अर्ज दाखल केला होता.

या प्रकरणात युक्तिवाद करताना अॅड. अक्षय शिंदे यांनी नमूद केले की, सदर प्रकरण पूर्णतः परिस्थितीजन्य पुराव्यावर आधारित असून प्रकरणात कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार उपलब्ध नाही. तसेच, कथित वाहन आणि मृत्यू यांच्यातील संबंध सिद्ध करणारा कोणताही वैज्ञानिक अथवा ठोस पुरावा तपास यंत्रणेकडे उपलब्ध नाही. आरोपीच्या पुढील कोठडीची आवश्यकता राहिलेली नाही, असा मुद्दाही न्यायालयासमोर मांडण्यात आला. सरकारी पक्षाने जामीन अर्जास विरोध केला होता मात्र दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायालय यांनी या प्रकरणातील पुरावे व सर्व बाबी लक्षात घेऊन आरोपी ऋषिकेश बाळासाहेब घिगे यास रु. १,००,०००/- (एक लाख) च्या वैयक्तिक जातमुचलक्यावर व त्याच रकमेच्या एक जामीनदारावर नियमित जामीन मंजूर केला आहे.





