अहिल्यानगर दिनांक २ जुलै
हॉटेल मध्ये जेवण करण्यासाठी गेलेल्या ग्राहकाला कोल्ड्रिंक च्या बाटली वरून झालेल्या किरकोळ वादातून ग्राहकाला कमरेला फॅक्चर होई पर्यंत मारहाण करण्याचा प्रकार नगर शहरातील टिळक रोड परिसरात घडला आहे. याप्रकरणी अक्षय संजय शेलार याच्या फिरतीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात आदेश जाधव, हिरा जाधव यांच्यासह 10 ते 12 वेटरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी हकीकत आशिकी 2 जुलै रोजी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास अक्षय संजय शेलार आणि त्याचा मित्र रुतुपर्ण जाधव असे दोघे हॉटेल नंदनवन येथे जेवन करण्यासाठी गेले होते . त्यांचे जेवण झाल्यानंतर रुतुपर्ण हा हात धुण्यासाठी बेसीनकडे गेला व अक्षय शेलार जेवणाचे बील देणेकरीता हॉटेलचे काऊंटरजवळ गेला होता, जेवणाचे बील भरुन जेवणाच्या टेबलवर असलेली कोल्ड्रींकची बॉटल बाबत हॉटेलच्या वेटरला शेलार शेलार याने विचारले असता. वेटरने अक्षय शिंदे यास सांगितले की, ती कोल्ड्रिंकची बॉटल मी फेकुन दिली आहे. त्यावेळी मी वेटरला म्हणालो की, तु मला न विचारता कोल्ड्रिंकची बॉटल का फेकली हे मला म्हणाले की, सदर कोल्ड्रिंकची बॉटल ही आम्ही टाकुन दिलेली आहे. तुला काय करायचे ते कर. असे म्हणून काऊंटरवर बसलेले दोघा जणांनी काउंटर बाहेर येत अक्षय संजय शेलार यास शिवीगाळ करुन लाथा बुक्क्यांनी मारहाण करू लागले. तर त्या ठिकाणी आलेल्या दहा-बारा मीटरने अक्षय शिंदे यास लाथा बुक्क्यांनी आणि लोखंडी रॉडने मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी अक्षय याचा मित्र
रुतुपर्ण हा भांडणे सोडवण्यासाठी मध्ये आले असता त्यासही मारहाण करण्यात आली. त्यानंतर अक्षय याच्या खिशातील 02 मोबाईल गळ्यातील 01 सोन्याची चैन हिसकावुन घेतली, तसेच माझा रुतुपर्ण याच्या खिशातील 01 मोबाईल हिसकावुन घेण्यात आला. त्यानंतर दोघांनाही बाहेर सोडण्यात आले.
त्यानंतर अक्षय आणि रुतुपर्ण दोघेजण जखमी अवस्थे मध्ये हॉस्पीटल मध्ये उपचार घेण्यासाठी गेले असता रुतुपर्ण याच्या कमरेचा एक्स रे काढला असता त्याच्या कमरेला फ्रैक्चर असल्याचे लक्षात आले. त्या नंतर उपचार घेऊन दोघांना डॉक्टरांनी घरी सोडल्या नंतर आज दोघांनी कोतवाली पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली आहे.
मात्र यावरून एक लक्षात येते की दूध गाड्यांना रात्री अकरा वाजता व्यवसाय बंद करण्यास भाग पाडणारे पोलिस मात्र पहाटे पर्यंत सुरू असलेल्या हॉटेल वर कारवाई का करत नसतील असा प्रश्न या प्रकरणानंतर पुन्हा उपस्थित होतोय.





