अहिल्यानगर : शहरातील पाईपलाईन हडको परिसरात महानगरपालिकेच्या रुग्णालयाजवळ आज दुपारी साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास एका टपरीला अचानक आग लागली. काही क्षणांतच आगीने मोठे स्वरूप धारण केल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला.

आगीची माहिती मिळताच नगरसेवक निखिल वारे यांनी घटनास्थळी धाव घेतली. रुग्णालयात उपलब्ध असलेल्या फायर सिलेंडरच्या माध्यमातून आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र संबंधित सिलेंडर रिकामा असल्याचे समोर आले.
विशेष म्हणजे, याचवेळी महानगरपालिका रुग्णालयात शिबिर सुरू असून, त्यासाठी सुमारे १०० ते १५० नागरिक उपस्थित होते. त्यामुळे आग अधिक भडकली असती तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली होती.




