Homeशहरदिवाळीचा गोडवा वंचित विद्यार्थ्यांसोबत; भिंगार प्रेस क्लबचा सामाजिक उपक्रम सावित्री भीमा गौतमी...

दिवाळीचा गोडवा वंचित विद्यार्थ्यांसोबत; भिंगार प्रेस क्लबचा सामाजिक उपक्रम सावित्री भीमा गौतमी बोर्डिंग स्कूलमध्ये मिठाई आणि फटाक्यांचे वाटप; विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलले आनंदाचे हास्य

advertisement

अहिल्यानगर : दिवाळीचा सण म्हणजे आनंद, उत्साह आणि आपुलकीचा सण. मात्र, समाजातील प्रत्येक घटकाला हा आनंद अनुभवता यावा, या भावनेतून भिंगार प्रेस क्लबच्या वतीने दिवाळीचे औचित्य साधून सावित्री भीमा गौतमी बोर्डिंग स्कूलमधील वंचित विद्यार्थ्यांसाठी विशेष उपक्रम राबविण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना मिठाई आणि फटाक्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला.

दिवाळीचा आनंद केवळ स्वतःपुरता मर्यादित न ठेवता समाजातील गरजू आणि वंचित मुलांसोबत सण साजरा करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. विद्यार्थ्यांना मिठाई आणि फटाके मिळाल्याने त्यांच्या आनंदात भर पडली.

यावेळी क्लबचे सचिव प्रसाद शिंदे म्हणाले, “दिवाळी हा आनंद वाटण्याचा सण आहे. समाजातील प्रत्येक मुलाला दिवाळीचा आनंद घेता यावा, हीच आमची भावना आहे. परिस्थितीमुळे काही मुलांना सणाचा आनंद इतरांप्रमाणे घेता येत नाही. अशा मुलांच्या चेहऱ्यावर हसू फुलविणे, त्यांच्यासोबत आनंदाचे क्षण घालविणे, हेच खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी करणे आहे. भिंगार प्रेस क्लबच्या माध्यमातून यापुढेही असे सामाजिक उपक्रम राबविण्याचा आमचा प्रयत्न राहील.”
या उपक्रमावेळी भिंगार प्रेस क्लबचे अध्यक्ष बाबासाहेब ढाकणे, उपाध्यक्ष स्वप्निल झोडगे, सचिव प्रसाद शिंदे, सहसचिव अमोल भिंगारदिवे, खजिनदार वैष्णवी कदम, तसेच सदस्य गिरीश रासकर, मोहसीन कुरेशी, अनिकेत यादव, प्रशांत पाटोळे, मोहसीन सय्यद, स्वामी गोसावी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
समाजातील वंचित घटकांसोबत सणाचा आनंद वाटून घेत भिंगार प्रेस क्लबने सामाजिक बांधिलकी जपण्याचा आदर्श या उपक्रमातून घालून दिला.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular