Homeशहरअहिल्यानगर शहरात 'या' ठिकाणी उभारला जाणार दिवंगत माजी आमदार अरुणकाका जगताप यांचा...

अहिल्यानगर शहरात ‘या’ ठिकाणी उभारला जाणार दिवंगत माजी आमदार अरुणकाका जगताप यांचा पुतळा; महानगर पालिकेत एकमुखी ठराव…

advertisement

अहिल्यानगर प्रतिनिधी दिनांक ४ नोव्हेंबर

अहिल्यानगर महापालिकेच्या महासभेत प्रारुप विकास आराखड्याबाबत न्यायालयात भक्कम बाजू मांडण्याचा आणि सावेडीतील गंगा उद्यान चौकात दिवंगत माजी आमदार अरुणकाका जगताप यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. बुधवारी अहिल्यानगर येथे पार पडलेल्या या सभेत आयुक्त यशवंत डांगे यांनी ही माहिती दिली.

अहिल्यानगर मधील महात्मा फुले चौकात स्वर्गीय अरुण काका जगताप यांची १८ फूट उंचीची प्रतिमा बसवण्यात आली आहे.

तर स्व. अरुणकाका जगताप यांचा पूर्णाकृती पुतळा गंगा उद्यान चौक येथे स्वर्गीय आमदार अरुणकाका जगताप यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा विषय समेत चर्चेला आला. सागर बोरुडे यांनी पुतळा उभारणीसाठी आवश्यक प्रक्रिया आणि परवानग्या मिळविण्याकरिता कालमर्यादा निश्चित करावी, तसेच या कामाचा पाठपुरावा करण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करावी, अशी मागणी केली. सुरेश बनसोडे यांनी चौकाला काका चौक असे नाव देऊन नामकरण करण्याची सूचना केली. बाबासाहेब वाकळे यांनीही समिती स्थापन करून पुतळा उभारणीची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी, चौकाचे सुशोभीकरण करावे आणि चौकाला अरुणकाकांचे नाव द्यावे, अशी भूमिका मांडली. यावेळी संपत बारस्कर आणि प्रकाश भागानगरे यांनीही चर्चेत सहभाग घेतला. महापौर ज्योती गाडे यांनी महापौर, उपमहापौर, बाबासाहेब वाकळे आणि संपत बारस्कर यांच्यासह सर्व संबंधितांचा समावेश असलेली समिती स्थापन करण्यात येईल, असे सांगितले. त्यानंतर हा विषय मंजूर करण्यात आला.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular