Home क्राईम अहमदनगरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात पोलिसास मारहाण करणाऱ्या राजू काळोखे विरुद्ध गुन्हा...

अहमदनगरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात पोलिसास मारहाण करणाऱ्या राजू काळोखे विरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर दि.१५ नोव्हेंबर

मंगळवारी दुपारच्या सुमारास जिल्हा सत्र न्यायालयातील न्यायमूर्ती सुपेकर यांच्या दालनासमोर राजु मुरलीधर काळोखे हा मोठमोठ्याने आरडाओरडा करुन शिवीगाळ दमदाटी करीत असल्याने त्या ठिकाणी बंदोबस्तास असलेल्या पोलीस कर्मचारी अनिल चव्हाण यांनी राजू काळोखे यास समजून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र राजू काळोखे याने पोलीस कर्मचारी चव्हाण यांना मारहाण करून शिवबाळ केली तरीही अनील चव्हाण यांनी न्यायालय मधील असलेल्या लॉकअप पर्यंत राजू काळोखे यास नेल्यानंतर राजू काळोखे याने लॉकअप गार्डचे खिडकीच्या काचेला डोक्याने मारुन मी आत्महत्या करतो व पोलीसांना कामाला लावतो व माझ्या पत्नीला तुमच्या विरुदध विनयभंगाची केस दाखल करण्यास सांगतो असं म्हणून पोलिसांना दम देत होता.

या सर्व झटापटीत पोलीस कर्मचारी अनील चव्हाण हे चांगले जखमी झाले होते. त्यामुळे त्यांना साईदीप हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार राजु मुरलीधर काळोखे (वय 42 वर्ष रा लालटाकी सिध्दार्थनगर ता.जि. अहमदनगर) याच्या विरोधात भादवि कलम 353,332,309,504,506,427 प्रमाणे भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version