Home Uncategorized आशा टॉकीज चौकात कोतवाली पोलिसांचा छापा सापडल्या तलवारी एका विरुद्ध गुन्हा दाखल

आशा टॉकीज चौकात कोतवाली पोलिसांचा छापा सापडल्या तलवारी एका विरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर १८ ऑक्टोबर

अहमदनगर शहरातील परिसरातील अरीशा कलेक्शन या दुकानातून पोलिसांनी तलवारी गुप्ती आणि चाकू  अशी 21 हत्यारे जप्त केले आहेत.

या बाबत हकीकत अशी की शाहरतील अशा टॉकीज चौकात अरीशा कलेक्शन या दुकानात तलवारी विकत असल्याची माहिती कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांना मिळली होती त्या नुसार कोथरूड पोलीस स्टेशनचे पीएसआय कचरे पोलीस कर्मचारी योगेश भिंगारदिवे, योगेश खामकर, संदीप थोरात, इनामदार,सुजय हिवाळे ,अमोल गाडे, महिला पोलीस कर्मचारी इनामी बागवान यांच्या पथकाने संबंधित दुकानावर जाऊन छापा टाकला असता या ठिकाणी तलवारी गुप्ती तसेच चाकू आढळून आले आहेत तसेच या ठिकाणी हुक्का पार्लर साठी लागणारे साहित्य पोलिसांनी जप तक केले आहेत याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात अरीशा कलेक्शनचे मालक हुमायू शेख याच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल शहर पोलीस उपअधीक्षक अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे पीएसआय कचरे पोलीस कर्मचारी योगेश भिंगारदिवे, योगेश खामकर, संदीप थोरात, इनामदार,सुजय हिवाळे ,अमोल गाडे, महिला पोलीस कर्मचारी इनामी बागवान यांच्या पथकाने केली.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version