Home राज्य स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकाची मराठा समाजा विषयी आक्षेपार्ह्य व अश्लील भाषा...

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकाची मराठा समाजा विषयी आक्षेपार्ह्य व अश्लील भाषा वापरल्याची क्लिप व्हायरल

जळगाव दि.१४ सप्टेंबर
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक(local crime branch police inspector) किरणकुमार बकाले यांची मराठा समाजाविषयी (Maratha community)आक्षेपार्ह्य व अश्लील भाषा (offensive and obscene language ) वापरल्याचे फोनवरील संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. या क्लिप वरून चांगलाच गदारोळ मजला असून किरणकुमार बकाले यांना बडतर्फ (sacked) करा अशी मागणी आमदार मंगेश रमेश चव्हाण यांनी केली आहे.

एका पोलीस अधिकाऱ्याची एखाद्या समाजाविषयीची भावना व वापरलेली भाषा पाहता अश्या जातीयवादी प्रवृत्तीच्या अधिकाऱ्याचे तत्काळ निलंबन करण्यात येऊन त्याची चौकशी करावी अशी मागणी आमदार (mla)रमेश चव्हाण यांनी जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक डॉ.प्रवीण मुंडे यांच्याकडे फोनवरून केली होती. घटनेचे गांभीर्य पाहता किरणकुमार बकाले याला नियंत्रण कक्षात (control room)जमा करण्यात आले आहे.

ही आहे ती व्हायरल ऑडिओ क्लिप

 

आवाज महाराष्ट्र टीम या व्हायरल ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही

 

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version