HomeUncategorizedअभिषेक कळमकर यांना कायदा व सुव्यवस्थेबाबत बोलण्याचा अधिकारच नाही - देवेंद्र बारस्कर

अभिषेक कळमकर यांना कायदा व सुव्यवस्थेबाबत बोलण्याचा अधिकारच नाही – देवेंद्र बारस्कर

advertisement

अहमदनगर दिनांक १२ फेब्रुवारी

अहमदनगर शहरातील आणि जिल्ह्यातील कायदा संस्थेबाबत नुकतीच एक पत्रकार परिषद घेऊन शरद पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले होते. त्यामध्ये त्यांनी अहमदनगर जिल्ह्यातील विविध गुन्हेगारी घटनांबाबत भाष्य केले आहे. ते भाष्य करत असताना त्यांनी जिल्ह्यातील व शहरातील घडलेल्या घटनांचा दाखला दिला होता व पोलीस प्रशासन कसे कमकुवत आहे, हे भासविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र हा सर्व नाटकीपणा असून नागरीक म्हणून कळमकर यांच्या भ्रष्ट व गुन्हेगारांना मदत करणारा चेहरा लवकरात लवकर जनतेसमोर आणणार आहोत असे आव्हान शहर विकास मंचच्या वतीने देवेंद्र बारस्कर यांनी दिले आहे.

देवेंद्र बारस्कर यांनी नुकतेच एक प्रसिद्ध पत्रक काढले असून यामध्ये त्यांनी अभिषेक कळमकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. कळमकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमधील वक्तव्यामुळे जनमानसांमध्ये पोलीस प्रशासना विरुध्द भावना निर्माण करण्याचा प्रयत्न होता मात्र वास्तवित अभिषेक कळमकर यांच्याबरोबर सदरच्या पत्रकार परिषदेमध्ये सुदाम भोसले नामक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पदाधिकारी होते. ज्यांना नुकतेच पद देण्यात आलेले आहे. परंतु त्यांची पुर्वाश्रमिचा इतिहास जर पाहिला तर ते एक खुन, मारामाऱ्या अशा गुन्ह्यातील आरोपी असून त्यांच्यावर सन १९९० च्या दशकात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याबाबत पोलीस यंत्रणेकडे योग्य ती माहिती आहे. त्यांच्यावर या गुन्ह्यांमुळे पोलीस प्रशासनाकडून एक मोठी अशी प्रतिबंधात्मक कारवाई केल्याचे बोलले जाते. त्यामुळे स्वतः अभिषेक कळमकर हे अशा गुंड प्रवृत्तींच्या लोकांना बरोबर घेऊन स्वतः शेजारी बसून त्यांना पद देऊन एक प्रकारे शहरवासियांवर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.

तसेच अभिषेक कळमकर हे जेव्हा महापौर म्हणून अहमदनगर महानगरपालिकेत कार्यरत होते. त्यावेळेस त्यांचे तात्कालीन स्वीय सहाय्यक यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयामार्फत एक कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी त्यांच्या स्वीय सहाय्यकास भ्रष्टाचार करण्याच्या कारवाईमध्ये अटकही करण्यात आलेली होती. त्यावेळेस सदरचे स्वीय सहाय्यक हे कोणाकरिता भ्रष्टाचार करत होते, हे न समजण्या इतके अहमदनगर शहरवासी आज्ञानी निश्चित नाही. त्यावेळी आपल्याला ज्या अधिकारी व राजकीय लोकांनी वाचविले, हे सर्व जनतेला माहिती असून त्याबाबत योग्य ती चौकशी पुन्हा एकदा व्हावी. याकरिता आम्ही स्वतः पाठपुरवा करणार आहोत. अशा भ्रष्टाचारी लोकांकडून कायदा व सुव्यवस्थेबाबत बोलणे हणजे ” मी नाही त्यातली आणि कडी लाव आतली’ अशी गत आहे.

अनेक वर्षापूर्वी अहमदनगर शहरातील झोपडी कॅन्टीन परिसरात एक मुस्लिम समाजाचे धार्मिक विधी करण्याचे स्थान होते. त्या स्थानाच्या जागेवर आज एक भव्य अशी इमारत उभी असून तो भूखंड जेव्हा खाली करण्यात आला होता. त्यावेळी आपण व आपले चुलते यांनी सदर बाबत कुठेही तक्रार केली नव्हती किंवा सदरचा भूखंड हा कोणीतरी ताबेमारी करतोय या अशायाखाली आपण साधा शब्द ही बोलले नव्हता. मग सदर भूखंडाचा श्रीखंड आपल्याला मिळाला होता का ? याबाबत आम्हाला सुध्दा प्रश्न पडला आहे. त्यामुळे आता आपल्याला ताबेमारी व कायदा व सुव्यवस्था याबाबत बोलण्याचा काही एक अधिकार नाही, असे आम्हाला सामान्य नगरकर या नात्याने वाटत असल्याचे या प्रसिद्धी पत्रकात बारस्कर यांनी म्हटले आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular