HomeUncategorizedमराठा समाजाच्या वतीने अहमदनगर मधून अडीच लाख ना हरकत प्रमाणपत्र राज्य सरकारकडे...

मराठा समाजाच्या वतीने अहमदनगर मधून अडीच लाख ना हरकत प्रमाणपत्र राज्य सरकारकडे रवाना…

advertisement

अहमदनगर दि.१२ फेब्रुवारी

मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे २६ जानेवारी रोजी मुंबई येथे संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो मराठा समाजाचे नागरिक मराठा समाजाला आरक्षण ओबीसी मधून मिळावे या मागणी करता गेले होते.त्यावेळी मुंबईच्यावेशी वरच म्हणजे वाशी येथे स्वतः महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्या ठिकाणी झालेल्या सभेमध्ये मराठा आरक्षण बाबत ठोस भूमिका घेत अधिसूचना काढली होती या अधिसूचनाला 16 फेब्रुवारी पर्यंत हरकती घेण्याबाबत राज्य सरकारने सूचना केल्या होत्या.

अहमदनगर मधील सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने राज्य सरकारला सगे सोयरे या शब्दसह ओबीसी मधून आरक्षण मिळावे यासाठी अडीच लाख ना हरकत प्रमाणपत्र पाठवण्यात आले आहेत.

राज्य सरकारने काढण्यात आलेली अधिसूचना योग्य असून ती लवकरात लवकर घटनेत नियमित करून लागू करावे अशी विनंती करत 25000 ना हरकत प्रमाणपत्र राज्य सरकारला पाठवण्यात आले आहेत.

तर मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने काढलेल्या अधिसूचनेत सगेसोयरे हा शब्द वापरल्याने सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने राज्य सरकारचे आभार मानण्यात आले.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular