अहमदनगर दि २२ जुलै
महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाल्यानंतर पातळीवर राजकारण बदलत चालले आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट तयार झाल्यानंतर शरद पवार गटातर्फे अजित पवार यांच्याकडे गेलेल्या आमदार आणि त्यांच्या समर्थकांची हकलपट्टी सुरू झाली आहे. तर दुसरीकडे अजित पवार त्याच लोकांना पुन्हा पद देऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन करत आहेत. असा सपाटा सध्या राज्यात सुरू आहे.
अहमदनगर शहरातील दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष माणिक विधाते यांना बडतर्फ करण्यात आले होते.त्यांच्या जागी कोण हा प्रश्न समोर आला असताना आता अभिषेक कळमकर यांचा मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख खासदार शरद पवार आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांची भेट घेतल्यानंतर आता शरद पवार यांच्या गटाला अभिषेक कळमकर यांच्या रूपाने शहरात पक्षाची ताकद वाढवण्यासाठी चांगला चेहरा मिळू शकतो अशी चर्चा सुरू झाली आहे यावेळी त्यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि शरद पवार यांचे खंदे समर्थक दादाभाऊ कळमकर हेही उपस्थित होते.