अहमदनगर दि.२२ जुलै
अहमदनगर शहरातील शिवसेनेचे नेते माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला असून तसा अधिकृत राजीनामा त्यांनी पक्षाकडे पाठवला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सचिव खासदार अनिल देसाई यांच्याकडे राजीनामा पत्र अभिषेक कळमकर यांनी दिले आहे.
मागील 3 वर्षांपासून अभिषेक कळमकर यांनी शिवसेनेत काम केले होते त्या आधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असताना झालेल्या अंतर्गत वादामुळे त्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला होता त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.
या राजीनामा पत्रात त्यांनी शिवसेनेत काम करण्याची संधी दिल्याबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहे. तसेच पक्षातून बाहेर पडताना कोनतीही नाराजी नसल्याचेही त्यांनी नमूद केल आहे.
शिवसेनेचे संस्थापक हिंदुहृदयसम्राट पूज्य बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, नगरचे माजी आमदार आणि शिवसेनेचे उपनेते स्व. अनिलभैया राठोड,
यांची प्रेरणा आणि आशीर्वाद ही माझ्या आयुष्याची महत्त्वाची शिदोरी आहे. राज्यातील आणि देशातील बदलत्या राजकीय परिस्थितीत माझ्या क्षमतांचा व्यापक उद्दिष्टांसाठी उपयोग व्हावा, असे मला वाटते. शिवसेनेच्या मूळ धारेला अनुसरून परंतु
वेगळ्या पद्धतीने या संदर्भात काम करण्याची माझी इच्छा आहे. त्यामुळे माझ्या शिवसेना सदस्यत्वाचा राजीनामा मी देत असल्याचं त्यांनी नमूद केले आहे.