मुंबई दि.२४ मे
महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे 10 जून रोजी आयोध्या येथे जाणार होते. याबाबतची तारीख याआधीच जाहीर केली होती. त्यानंतर या दौऱ्याबाबत अनेक आरोप-प्रत्यारोप सध्या सुरू आहेत त्याचबरोबर राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा ही सध्या भाजपच्या खासदाराच्या विरोधामुळे चांगलाच चर्चेत आला आहे.
मात्र आता आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याची तारीख बदलली असून आदित्य ठाकरे 10 जून ऐवजी 15 जूनला आयोध्येला जाणार असल्याचं खासदार संजय राऊत यांनी सांगितला आहे.