अहमदनगर दि.१ डिसेंबर
भिंगार कॅम्प पोलीस हद्दीतील नागरदेवळे येथील किरण भारत विघ्ने यांच्या मालकीच्या सुमारे 31 हजार रुपये किमतीच्या सेंट्रींग प्लेटची चोरी अज्ञात चोरट्यांनी प्रियदर्शनी शाळा समोरून चोरून निळ्याची फिर्याद भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनला 31 नोव्हेंबर रोजी दिली होती. त्यानुसार भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांनी या चोरीबाबत तपास सुरू केल्यानंतर भिंगार परिसरातील सैनिक नगर भागात भिंगार कॅम्पचे पोलीस कर्मचारी सफौ.रमेश वराट, पोहेकाँ.बिभीषन दिवटे, पोना. भानुदास खेडकर, पोना. राहुल द्वारके, पोकों. अमोल आव्हाड,चापोका. अरूण मोरे पेट्रोलिंग करत असताना दोन इसम संशयीत रित्या फिरताना मिळून आले त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये चोरी केलेल्या सेंट्रींग प्लेट ची माहिती मिळाली तसेच चोरी केलेल्या सेंट्रींग प्लेटा पैकी 7,000/- रू किं च्या 07 प्लेटा काढून दिल्या तसेच गुन्ह्यात वापरलेली 50,000/- रू कि ची मो सा असा एकून 57,000/- रू कि चा मुद्देमाल केशव उर्फ काज्या ताज्या भोसले (वय 21 वर्षे रा.चर्चेचे मागे, डेअरी फार्म, केकती शिवार,ता.जि.अहमदनगर ).रोहीदास उर्फ रायतास भरदार काळे (वय 35 वर्षे रा.जातेगाव शिक्रापुर ता. शिरूर जि.पुणे ) अशी या चोरट्यांची नावे असून त्यांना न्यायालयासमोर हजर केल असता त्यांना एक दिवसाची पोलीस कस्टडी मिळाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोना संतोष आडसुळ हे करीत आहेत.