Homeशहरएमआर,कंपाऊंडर करत होते कोविड काळात रुग्णांवर उपचार तर जे डॉक्टर नगरमध्ये आलेच...

एमआर,कंपाऊंडर करत होते कोविड काळात रुग्णांवर उपचार तर जे डॉक्टर नगरमध्ये आलेच नाहीत त्यांच्या नावावर नगर शहरात कोविड सेंटरच्या परवानग्या….

advertisement

अहमदनगर दि.२ डिसेंबर

कोरोना काळात कोविड केअर सेंटरची बोगस परवानगी घेऊन डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर व हॉस्पीटल चालवून रुग्णांना उपचार देणारे खासगी हॉस्पिटलांची चौकशी व्हावी तसेच या प्रकरणात हस्तेक्षेप करुन खासगी डॉक्टरांना वाचविण्यासाठी पुढे आलेल्या डॉक्टर संघटनेच्या दबावाला बळी न पडता सर्वसामान्यांच्या जिविताशी खेळून अनेकांच्या मृत्यूस जबाबदार असणार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक व कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली असल्याची माहिती तक्रारदार तथा सामाजिक कार्यकर्ते संदिप अशोक भांबरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या प्रकरणात शासनाच्या नियमांची पायमल्ली करुन कोणतीही शहानिशा न करता कोविड सेंटरच्या परवानग्या देण्यात आल्या, डॉक्टरांची संघटना दबाव तंत्र वापरुन तपासात अडथळा निर्माण करीत आहे. तर या प्रकरणात मनपा पोलीस प्रशासनाला पुरावे देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा अरोप भांबरकर यांनी केला आहे. सर्व सामान्यांच्या पाठिशी उभे राहण्यासाठी त्यांनी या प्रश्‍नावर जन आंदोलन करण्याचा व वेळप्रसंगी उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.

शासनाच्या आरोग्य विभागाने कोरोनाच्या उपचारासाठी कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर व डेडिकेटेड कोविड हॉस्पीटल या त्रिस्तरीय रचना केली होती. डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर मध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर उपाचार देण्याची व्यवस्था होती. तर डेडिकेटेड कोविड हॉस्पीटल मध्ये जे रुग्ण कोविड पॉझिटिव्ह असून, त्यांना तीव्र लक्षणे आहेत अशा रुग्णांना उपचार देण्याची व्यवस्था केलेली होती. 24 एप्रिल 2021 च्या आदेशानुसार खाजगी रुग्णालयात कोविड सेंटर सुरु करण्याचे सर्व अधिकार मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांना नव्हता, हा आदेश फक्त मनपा संचलित कोविड सेंटरसाठी (डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर व डेडिकेटेड कोविड हॉस्पीटल) होता. कोविड सेंटरची परवानगी देण्याचा अधिकार फक्त आयुक्तांना होता. शासनाच्या आदेशान्वये जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी तर मनपा हद्दीत आयुक्तांना कोविड सेंटरसाठी सक्षम प्राधिकारी म्हणून नेमणुक करण्यात आलेली होती.

खासगी रुग्णालयांनी आर्थिक हव्यासापोटी परवानगी नसताना स्वत:च्या हॉस्पिटलमध्ये उपचार दिले. अतितीव्र रुग्ण तपासण्याचा व उपचार करण्याचा कोणताही अधिकार नसल्याचे माहित असतांनादेखील त्यांच्यावर उपचार केले. रुग्णांची परिस्थिती गंभीर झाल्यानंतर त्यांना जेथे व्हेंटीलेटरची सुविधा असेल अशा डेडिकेटेड कोविड हॉस्पीटल मध्ये घेऊन जाण्यास सांगितले.

शहराबाहेर असलेल्या अनेक डॉक्टरांच्या नावाने शहरात परवानग्या देण्यात आल्या. मात्र हे डॉक्टर उपचारासाठी कधी शहरात आलेच नव्हते. केडगावचे हॉस्पिटल मध्ये एक एमआर हा रुग्णांवर उपचार करीत होता. बालिकाश्रम रोडवरील एका हॉस्पिटलमध्ये कम्पाऊंडर उपचार करुन रुग्णांकडून पैसे उकाळीत असल्याचे उघडकीस आल्याचे त्यांनी यावेळी म्हंटले.

महाराष्ट्र शासनाने कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत 80 टक्के खाजगी हॉस्पिटल राखीव केले होते. त्याची स्वतंत्र यादी महानगरपालिकेने दिली आहे. त्यामुळे या बोगस खासगी हॉस्पिटल धारकांचा आणि 80 टक्के राखीव हॉस्पिटल धारकांचा काही संबंध येत नसल्याचे भांबरकर यांनी म्हंटले आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular