Homeराजकारणअरे या कोंबडी चोरांचं करायचं काय खाली डोकं वर पाय घोषणांनी महापालिका...

अरे या कोंबडी चोरांचं करायचं काय खाली डोकं वर पाय घोषणांनी महापालिका दणाणली महानगरपालिकेचे आयुक्त पंकज जावळे यांना अपशब्द वापरल्या प्रकरणी आमदार नितेश राणे यांचा निषेध करत महापालिकेचे कामकाज बंद आंदोलन

advertisement

अहमदनगर दि.१९ एप्रिल

अरे या कोंबडी चोरांचं करायचं काय खाली डोकं वर पाय म्हणत भाजप आमदार नितेश राणे यांचा महानगरपालिका कामगार युनियनच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. तसेच महानगरपालिकेचे आयुक्त पंकज जावळे यांना उद्देशून शिवीगाळ केल्याप्रकरणी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आज अत्यावश्यक सेवा वगळून काम बंद आंदोलन केले होते.

भाजपचे आमदार नितेश राणे मंगळवारी नगर शहरातील कापड बाजार येथे येऊन त्यांनी कापड बाजारातील व्यापाऱ्यांची भेट घेतली होती. मागील आठवड्यात दोन कापड व्यवसायिकांवर हल्ला झाल्यानंतर बाजारपेठेत अनेकांनी आंदोलन केली गेली याच पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार नितेश राणे यांनीही घटनास्थळी भेट देऊन कापड बाजार मधील मुख्य चौकात झालेल्या छोटेखानी सभेत बोलताना अतिक्रमणाबाबत महानगरपालिका आयुक्त पंकज जावळे काचखाऊ भूमिका घेत असल्याचा उल्लेख करत नितेश राणे यांनी पंकज जावळे यांच्या बद्दल अपशब्द वापरले होते याचे पडसाद आज शहरात ठिकठिकाणी उमटले असून महानगरपालिकेच्या कर्मचारी वर्गातही याचे पडसाद उमटले आहेत.उच्च दर्जाच्या अधिकाऱ्याबद्दल बोलताना सांभाळून शब्द वापरायचे असताना थेट शिवीगाळ करण्याचा प्रकार झाल्यामुळे कर्मचारी संतप्त झाले होते. त्यामुळे आज महानगरपालिका कर्मचारी युनियनच्या वतीने महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयात निदर्शने करून आमदार नितेश राणे यांचा निषेध करण्यात आला तसेच त्यांच्या राजीनामाची मागणी ही यावेळी करण्यात आली.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular