अहिल्यानगर दिनांक २७ एप्रिल
पुणे येथील प्रसिद्ध असे रांका ज्वेलर्स प्रा.लि. कंपनी मधून जवळपास अठरा कोटी रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि लाखो रुपयांची रोख रक्कम कंपनीच्या मालकांना आणि संचालकांना न सांगता परस्पर दिल्याचे प्रकरण समोर आले असून याप्रकरणी पुणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता यामध्ये अहिल्यानगर मधील तीन जणांचा समावेश होता तर रांका ज्वेलर्स मध्ये चाळीस वर्षांमधून कामाला असलेल्या एका साठ वर्षीय मॅनेजरचा सहभाग आढळून आला होता.

प्रशांत बर्मेचा दुकानात मॅनेजर म्हणुन असल्याने तो दुकानातील सेल्सगर्ल कडुन ग्राहकांना दागिने जांगड (अँप्रुव्हल तत्वावर) द्यायचे आहे असे सांगुन त्यांचेकडुन दागिने ताब्यात घेवुन, प्रशांत बर्मेचा स्वतः जांगड (अँप्रुव्हल तत्वावर) नोंद करुन कविता रमाकांत पराळे, त्यांची मुलगी आणि रमाकांत पराळे यांना देत होता. अशा प्रकारे प्रशांत बर्मेचा, कविता रमाकांत पराळे, त्यांची मुलगी आणि रमाकांत पराळे यांनी संगणमत करुन रांका ज्वेलर्स या कंपनीची जवळपास १२.८०० ग्रॅम सोने त्याची किंमत जवळपास अठरा कोटी रुपयांची फसवणुक केल्याचा गुन्हा पुणे येथे दाखल करण्यात आला आहे. फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाल्या नंतर पुणे पोलिसांनी अहिल्यानगर येथे येऊन
रमाकांत पराळे आणि त्यांच्या मुलीला ताब्यात घेऊन अटक करून पुणे येथील कोर्टात हजर केले होते. पुणे येथील कोर्टने त्याना २९ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती पोलिसांनी आज पुन्हा कंपनीचा मॅनेजर प्रशांत बर्मेचा,रमाकांत पराळे आणि त्यांच्या मुलीला न्यायालयात हजर केले असता पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून या तिघांकडून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती दिली तपासात प्रगती होत असल्याने न्यायालयाने या तिघांनाही पुढील तपासासाठी एक मेपर्यंत पोलीस कस्टडीत ठेवण्याचा निर्णय दिला आहे. तर कविता पराळे यांची पोलिस कोठडीची मुदत तीस एप्रिल रोजी संपणार आहे.या प्रकरणात आरोपींच्या वतीने अँडव्होकेट महेश तवले , संजय दुशिंग , ॲड.प्रकाश सावंत ,सतिश गीते, संजय वालेकर यांनी काम पाहिले.





