Homeशहरतहसीलदार नगर यांचा १६,४१,६००/- दंडाचा आदेश रद्द

तहसीलदार नगर यांचा १६,४१,६००/- दंडाचा आदेश रद्द

advertisement

अहिल्यानगर दिनांक 27 एप्रिल
अहिल्यानगर मधील तहसीलदार वाळू साठ्या संदर्भात केलेली कारवाई अहिल्यानगर जिल्हा न्यायालयात रद्द करण्यात आले आहे या प्रकरणाची हकीगत अशी की
​ 5 फेब्रुवारी 2020 मध्ये तहसीलदार नगर यांनी अवैध वाळू साठ्या संदर्भात प्लॉट धारकावर रक्कम रु १६,४१,६००/- चा दंड आकारून स्थावर मालमत्ता जप्तीचा आदेश केला होता. जगनाडे यांचे घर बांधकामासाठी ५४ ब्रास वाळू अवैध रित्या साठा केल्याप्रकरणी व मंडल अधिकारी यांनी छापा टाकून पंचनामा करून कारवाई केली होती. त्याआधारे नगर तहसीलदार यांनी तसे आदेश करून जगनाडे यांचेवर दंडात्मक कारवाई केली होती. जगनाडे यांनी तहसीलदार यांचे आदेशाविरुद्ध अहमदनगर येथील प्रधान दिवाणी न्यायाधीश यांच्या कोर्टात दावा दाखल केला होता.या दाव्या मध्ये न्यायालयाने तहसीलदार यांचा रक्कम रु १६,४१,६००/- दंडाचा आदेश, तसेच जनागडे यांच्या स्थावर मिळकतीवर लावलेला जप्तीचा आदेश रद्द ठरवून लिलाव प्रक्रिया करू नये असा आदेश पारित केला.

Oplus_0

​या प्रकरणात जगनाडे यांचे विधीज्ञ श्री. सुहास टोणे यांनी पंचनाम्यातील त्रुटी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या तसेच तहसीलदार यांचा आदेश कसा बेकायदेशीर आहे याबाबत प्रभावी युक्तिवाद केला. त्यामुळे न्यायालयाने तहसीलदार यांचा आदेश रद्द ठरविला. या प्रकरणात विधीज्ञ श्री. सुहास टोणे यांना ॲड. अडागळे, ॲड. ढोणे , ॲड. सापिके , ॲड. गुंड व ॲड शिंदे यांनी सहकार्य केले.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular