अहमदनगर दि.९ डिसेंबर
महाराष्ट्र केसरी स्पर्धा पुण्यात होणार की नगरमध्ये होणार याबाबत चांगलेच तर्कवितर्क लागले जात असताना दोन दिवसांपूर्वी ही स्पर्धा नगरमध्ये होणार असल्याचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजनाचे पत्र आ.संग्राम जगताप यांना दिले ही महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा वाडिया पार्क येथे 25 डिसेंबर ते ३१ डिसेंबर दरम्यान होणार होती ही माहिती येत असतानाच 11 ते 15 जानेवारी दरम्यान पुण्यामध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धा होणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळत असून दिल्ली येथे खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांना भेटण्यासाठी मुरलीधर मोहोळ आणि रामदास तडस हे गेले होते त्यांच्यामध्ये झालेल्या बैठकीमध्ये खासदार सिंह यांनी पुण्यामध्ये 11 ते 15 जानेवारी दरम्यान केसरी महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेण्याबाबत हिरवा कंदील दिला असल्याची माहिती मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.
आयोजनाच्या बाबतीतला जो एक संभ्रम होता की पुण्यात होणार की नगरमध्ये होणार संघटनाचा अंतर्गत जो काही विषय होता ते आता स्पष्ट झालं असून कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिज भूषण सिंह यांनी पुण्यातल्या स्पर्धा संदर्भातलं पत्र आम्हाला दिले आणि म्हणूनच त्या स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला 15 तारखेला त्यांनी यावे असे निमंत्रण त्यांना देण्यासाठी आम्ही दिल्लीत आलो असल्याचं मुरलीधर मोहोळ रामदास तडस योगेशची दोडके आणि संदीप मोरे आधी दिल्लीला आले असल्याचं मोहोळ यांनी सांगितले त्यामुळे आता महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही पुण्यातच होणार असल्यास शिक्कामोर्तब झाला आहे.