Homeशहरशस्त्रक्रियेसाठी पुण्याला निघालेल्या कारला उड्डाणपुलावर अपघात उड्डाणपुलावरील गतीरोधकांमुळे अपघाताची मालिका सुरुच

शस्त्रक्रियेसाठी पुण्याला निघालेल्या कारला उड्डाणपुलावर अपघात उड्डाणपुलावरील गतीरोधकांमुळे अपघाताची मालिका सुरुच

advertisement

अहमदनगर दि.२१ नोव्हेंबर

– नगरकरांना प्रचंड उत्सुकता असलेल्या उड्डाणपुलाचे शनिवारी उद्घाटन झाले. रविवारी वाहतुकीसाठी तो खुला करण्यात आला. पहिल्याच दिवशी गतीरोधकांमुळे अपघात सुरु झाले. दुचाकीची धडका-घडकी झाल्याने वाहनचालक एकमेकांशी भांडत त्यांच्यात हाणामारीची घटना घडली; मदती ऐवजी बघ्यांनी व्हिडिओ काढून व्हायरल करण्यात धन्यता मानली.

आज (सोमवारी) सकाळी 8 च्या सुमारास वसंत टेकडी येथील रहिवासी व टॉपअप पेट्रोल पंचाचे व्यवस्थापक अशोक मुनोत पुणे येथे शस्त्रक्रियेसाठी होंडा सिटी (एमएच-16 सीव्ही 6696) कारने जात असतांना औरंगाबादहून पुण्याकडे जाणार्‍या एका स्विफ्ट कारने मागून धडक दिली. सुदैव्याने दोन्ही वाहनांचे फक्त नुकसान झाले. मात्र गाडीतील कोणालाही दुखापत झाली नाही.

उद्घाटनानंतर उड्डाणपुल सुरु झाला, त्या दिवसापासून अपघात सुरु झाले. छोटे-छोटे अपघात असले तरी ही मालिका आजही सुरु राहिली. वाहन चालकांना गतीरोधकांवरुन जाताना कसरत करावी लागते. तरी प्रशासनाने या अपघाताकडे गांभिर्याने लक्ष देऊन अनावश्यक गतिरोधक तातडीने काढून टाकावे, अशी मागणी वाहनचालक करीत आहेत.

 

माणुसकीचे दर्शन

या अपघाताच्यावेळी माजी नगरसेवक निखिल वारे आपल्या खाजगी कामासाठी जात असतांना त्यांनी वाहन थांबविले. अपघातग्रस्त वाहनांची अवस्था पाहून शस्त्रक्रियेसाठी निघालेल्या मुनोत यांना स्वत:चे वाहन देऊन पुण्याला रवाना केले.

याबाबत नितीन मुनोत यांनी प्रतिक्रिया देतांना सांगितले की, अपघात झाल्यावर फोटो काढून व्हिडिओ व्हायरल करणारे दिसतात, मात्र श्री.वारे यांनी प्रत्यक्षात शस्त्रक्रियेसाठी वाहन उपलब्ध करुन माणुसकीचे दर्शन घडविले याचा आदर्श इतरांनी घ्यावा. व्हिडिओ, फोटो काढण्यापेक्षा मदतीला प्राधान्य दिले तर अपघातग्रस्तांना आधार मिळेल, असे सांगितले.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular