Homeक्राईमचार ठिकाणच्या दरोड्यात चार लाखांचा मुद्देमाल चोरीला चोरट्यांच्या दहशतीने नागरिक भयभीत

चार ठिकाणच्या दरोड्यात चार लाखांचा मुद्देमाल चोरीला चोरट्यांच्या दहशतीने नागरिक भयभीत

advertisement

अहमदनगर दि.२६ डिसेंबर

अहमदनगर शहरातील कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास दरोडेखोरांनी धुमाकूळ घालत चार ठिकाणी घराच्या दरवाजे तोडून घरातील सोन्या चांदी सोन्या चांदीच्या वस्तूंसह रोख रकमेची चोरी केली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यश उमेश शेळके,आकाश सुभाष सुर्यवंशी वसंत रभाजी चांदणे ,राजु गंगाधर पडोळे अशा चौघांच्या घरी दरोडेखोरांनी बळजबरीने चाकूचा धाक दाखवून लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.

याप्रकरणी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये यश उमेश शेळके यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.२५ डिसेंबरच्या मध्यरात्री यश शेळके यांच्या घराचा कडी कोयंडा तोडून अज्ञात अनोळखी ६ इसमांनी घरात प्रवेश केला. त्यातील २ अनोळखी इसमांनी घरातील तिघांना एकत्रित बसवून चाकूचा धाक दाखवून इतर चार जणांनी घरातील सामानाची उचका पाचक सुरू केली आणि ३०,००० किमतीचे कानातले डुल, एक तोळा वजनाचे सोन्याचे दागिणे १५,०००/- तसेच ५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी आणि ७०००/- रु. रोख रक्कम तसेच मोबाईल घेऊन गेले जाताना चोरट्यांनी घरच्या बाहेरून दरवाजाला कडी लावून निघून गेले.मात्र यातील मोबाईल चोरट्यांनी घरा बाहेर फेकून दिले होते.

तर आकाश सुभाष सुर्यवंशी यांच्या घरातून याच चोरट्यांनी १,३५,०००/- रुपये किमतीचा साडेचार तोळयाचा सोन्याचा राणीहार, ६०,०००/- रु. किं चे दोन तोळयाचे लहान मुलाचे सोन्याचे दागिने असा १,९५०००/- रु.कि.चा ऐवज

तर वसंत रभाजी चांदणे यांच्या घरातून २१,०००/- रु. कि. चे ७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे डुल, २४,०००/- रु.कि.च्या ८ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या बाळया,६,०००/- रु.कि.च्या ३ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या बाळया, ३,०००/- रु. कि. चे ६० ग्रॅम वजनाचे चांदीचे पेंजन २,५००/- रु. कि. चे ५० ग्रॅम वजनाचे चांदीचे पैंजन,९,०००/- रुपये रोख रक्कम

राजु गंगाधर पडोळे, ३०,०००/- रु. कि. चे १०ग्रॅम वजनाचे सोन्याचे डोरले, ६०,०००/- रु. कि. चे २० ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण ३,०००/- रु. कि. चे १ ग्रॅम वजनाची सोन्याची बाळी ,२०,०००/- रु. कि. चा. आयफोन कंपनीचा एक्सेस मॉडेल असलेला मोबाईल फोन ,५,०००/- रु. कि. चा. ओप्पो कंपनीचा एफ १७ प्रो मॉडेल असलेला मोबाईल फोन

असे चार जणांच्या घरातील मुद्देमाल एकूण ४,३०,५००/- चोरीला गेला असून या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी अनोळखी ६ इसमां विरुद भादंवि कलम ३९५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular