Homeशहरप्रशासनाचे आदेश फक्त कागदावरच;नगर शहरात खुलेआम चायना मांजाची विक्री सुरूच ... चायना...

प्रशासनाचे आदेश फक्त कागदावरच;नगर शहरात खुलेआम चायना मांजाची विक्री सुरूच … चायना मांजा मुळे महानगरपालिकेचे प्रसिद्ध अधिकारी जखमी होऊनही महापालिकेकडून कोणतीच कारवाई नाही

advertisement

अहमदनगर दि.२६ डिसेंबर

अहमदनगर शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर चायना मांजा विक्री होत असून नगर शहराच्या गल्ली बोळा मध्ये या चायना मांज्याची खुलेआम विक्री होत आहे. हा चायना मांजा मानवी शरीरासह पशुपक्ष्यांच्या जीविताला हानी पोहोचवणारा आहे. दरवर्षी चायना मांजा मुळे निष्पाप पशुपक्ष्यांचा बळी तर जातोच पण त्याच बरोबर अनेक नागरिकही गंभीर जखमी झाल्याच्या घटना घडतात.

विभागीय आयुक्तांनी चायना मांजा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करा अशा आदेश दिलेच आहेत.त्याचबरोबर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनीही चायना मांजावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस प्रशासनही चायना मांजा विक्री विरोधात कारवाई करणार आहे. मात्र या फक्त जर तर आणि भविष्यात होणाऱ्या घटनाच आहेत. तर दुसरीकडे नगर शहरात रोज चायना मांजाचे हजारो बंडल विक्रीसाठी येत असून याची विक्री नगर शहरातील गल्लीबोळातून होत आहे. मात्र महानगरपालिका, पोलीस प्रशासन आणि विभागीय आयुक्त यांचे आदेश हे फक्त कागदावरच असल्याचे दिसून येत आहे.

चायना मांजा विक्री करण्यासाठी एक मोठी यंत्रणा असून याचा म्होरक्या ग.. जेल्ली नामाक व्यक्ती आहे. या गजल्लीच्या मुसक्या आवळल्यानंतर नगर शहरातील चायना मांजा कोण कोण विक्री करते याची लिस्ट त्याच्याकडून भेटू शकते . ग….जेल्ली हा पडद्याआड चा कलाकार असून सागर नावाचा व्यक्ती शहरात चायना मांजा विक्रीचे काम पाहतो.

यावर्षी या मांज्याची किंमत दुप्पट झाली असून पाचशे रुपये पासून तर हजार रुपये पर्यंत एक बंडल विक्रीसाठी उपलब्ध असून या चायना मांजाच्या विक्रीतून लाखो रुपयांचा आर्थिक व्यवहार रोजच सुरू आहे. या चायना मांजा मुळे अनेकांना गंभीर दुखापत झाल्यामुळे या चायना मांजर बंदी असताना हा मांजा नगर शहारत सर्व प्रशासनच्या नाकावर टिच्चून विक्री करत असल्याने आता महानगरपालिका प्रशासनाने आणि पोलीस प्रशासनाने आदेश कागदावर न ठेवता प्रत्यक्षात कृती करणे गरजेचे आहे.या चायना मांजा मुळे मागील आठवड्यात महानगरपालिकेचे प्रसिध्दी अधिकारी शशिकांत नजान आणि एक नागरिक जखमी झाले होते. तर अमरधाम येथील झाडांवर अनेक पशु पक्षी या चायना मांजा मुळे  मृत्युमुखी पडतात याची चर्चा महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये नगरसेवक गणेश कवडे यांनी घडवून आणली होती मात्र तरीही प्रशासन याबाबत गंभीर का होत नाही हे समजण्याला मार्ग नाही.

नगर शहरातील भराड गल्ली, गौरी घुमट ,तोफखाना प्रेमदान हडको, पाईपलाईन रोड ,श्रमिक नगर परिसर,बागडपट्टी नालेगाव वंजार गल्ली, माळीवाडा, या ठिकाणी काही विक्रेते चोरीछुपे चायना मांजा विक्री करत असतात मोपेड गाडीच्या डिक्की मध्ये मांजाचे रीळ ठेवून ते ग्राहकांपर्यंत चोरीछुपे पोहोचवण्यात येतात यासाठी खास सांकेतिक भाषा आणि खास माणसे नेमलेली आहेत.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular