Homeजिल्हाअहमदनगर शहरातील तोफखाना, कोतवाली,एमआयडीसी भिंगार पोलीस ठाण्याचे कारभारी बदलले जिल्हा पोलीस दलात...

अहमदनगर शहरातील तोफखाना, कोतवाली,एमआयडीसी भिंगार पोलीस ठाण्याचे कारभारी बदलले जिल्हा पोलीस दलात मोठे फेरबदल जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांचे आदेश

advertisement

अहमदनगर दि.१ मार्च
अहमदनगर जिल्हा पोलीस दलात विविध पोलीस ठाण्यामधील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून अहमदनगर जिल्हा पोलीस दलाचा कारभार हाती घेतल्यापासून पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी प्रथमच एवढे मोठे बदल केले आहेत.अनेक अधिकारी बदलीच्या प्रतीक्षेत होते कारण त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे बदलीच्या प्रदेशात होते ती प्रतीक्षा आता संपली असून अहमदनगर शहरातील तोफखाना पोलीस स्टेशन कोतवाली पोलीस स्टेशन एमआयडीसी पोलीस स्टेशन भिंगार पोलीस स्टेशन या ठिकाणी आता नवीन अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.
कोतवाली पोलीस स्टेशनला कर्जतवरू चंद्रशेखर मोहनराव यादव यांची नियुक्ती करण्यात अली आहे तर तोफखाना पोलीस ठाण्याच्या मपोनि/ ज्योती चंद्रकांत गडकरी यांना सुपा याठिकाणी नियुक्ती मिळाली आहे त्यांच्या जागी मधुकर धोंडीबा साळवे यांची नियुती झाली आहे संभाजी अभिमन्यु गायकवाड यांची बदली पारनेर येथे झाली आहे तर त्यांच्या जागी महेश पाटील यांना जामखेड येथे देण्यात आले आहे. विजय करे कर्जत येथे तर तालुका पोलीस ठाण्याचे साहयक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप एमआयडीसी येथे तर एमआयडीसीचे युवराज आठरे लोणी येथे नियुक्ती करण्यात आली आहे भिंगार पोलीस स्टेशनचे शिशिर कुमार देशमुख नगर तालुक्याचे नवीन कारभारी असतील तर भिंगार पोलीस स्टेशनला दिनकर मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कोरोना काळापासून अनेक अधिकाऱ्यांच्या बदली झाल्या नव्हत्या त्यामुळे सर्वांनाच बदलीच्या प्रतीक्षा असल्याने अखेर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी बदलांचे आदेश काढले आहे आता सर्वांचे लक्ष कर्मचाऱ्यांच्या बदल्यांकडे लागले आहे कारण कर्मचाऱ्यांच्या बदल्या रखडल्या असल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये सुद्धा आता या बदल्यांची प्रतीक्षा आहे

 

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular