अहमदनगर दि.२५ एप्रिल
अहमदनगर शहरात गेल्या काही महिन्यांपासून अत्यंत गढूळ वातावरण निर्माण झाले आहे. दोन समाजातील घरगुती भांडण असले तरी त्याला सार्वजनिक वादाचे स्वरूप देऊन दोन समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य केले जात आहेत. सोशल मीडिया मधील आभासी जगात वावरणाऱ्या तरुणांना तर जगात काय चाललंय हे समजायला तयार नाही सोशल मीडियावरील खोटे मेसेज सर्रास पुढे ढकलण्याची जणू काही स्पर्धाच लागली आहे. असे मेसेज पुढे ढकलले जात आहेत मात्र या मेसेजमुळे समाजात काय प्रतिक्रिया उलटेल याबाबत काहीच भान आजकालच्या तरुणांना राहिले नाही.
किरकोळ वाद झाला की पोलीस स्टेशन मध्ये शेकडो लोकांची होणारी गर्दी घोषणाबाजी आणि त्यातून उदभवणाऱ्या घटनांमुळे पोलिसांनाही रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून गस्त घालावी लागत आहे. अनेक छोटे मोठे वाद रोजच नगर शहरात होत आहेत. मात्र या वादांना जातीय झालर देऊन दोन समाजात वितूष्ट आणायचे कारस्थान रचले तर जात नाही ना असं आता प्रश्न पडू लागला आहे.
शहरा छोटा मोठा वाद झाला की काही क्षणातच ही बातमी गावभर पसरते त्यामुळे नागरिकही भयभीत होतात घराबाहेर पडायला घाबरतात याचा सर्वात मोठा परिणाम होतो तो बाजारपेठेवर.बाजारपेठ भर मध्यवस्तीत असल्याने काही प्रकरण झाले की त्याचं परिणाम बाजारपेठ बंद वर होतो हळूहळू आपली बाजारपेठ उध्वस्त होऊ लागली आहे हे कोणाला कसे समजत नसेल ! एक अफवा व्यापाऱ्यांचं लाखो रुपयांचे नुकसान करून जाते. रात्री चौका चौकात लागणाऱ्या खाद्यपदार्थांच्या गाड्यांना तर आजकाल कधी बंद करायचा आदेश येईल हे सांगायला नको कुठे काही घटना घडली की अशा खाद्यपदार्थांच्या हातगाड्यांना लगेच त्या ठिकाणाहून जाण्यास सांगितले जाते मग ती वेळ कोणतीही असो मात्र यामुळे खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर पदार्थ बनवून ठेवलेले असतात त्याचप्रमाणे रात्रीला दूध पिण्यासाठी येणारे ग्राहकही घाबरून जातात त्यामुळे रात्रीच्या चौपट्यांवर याचा परिणाम सर्वात जास्त होतो. मात्र दारू विकणारे मोठमोठे हॉटेल्सरात्रभर उघडे असले तरी कारवाई होत नाही हा दुजाभाव का असा प्रश्नही आता समोर येऊ लागला आहे.
छोटी मोठी भांडणे आता बास झाली कारण या छोट्या मोठ्या भांडणानं सामान्य नगरकर आता त्रस्त झाले आहेत. अफवा आणि अफेमधून होणारे परिणाम यामुळे बाजारपेठेत व्यापारी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे आता पोलिसांनी हातात दिलेल्या काठ्यांचा योग्य वापर करून नगर शहरात अशांतता पसरणाऱ्या टोळक्याविरुध्द कारवाई करून काठीचा प्रसाद दिल्यानंतरच ही शांतता प्रस्थापित होईल असं दिसतेय. कायदा आहेच मात्र कायद्या मधील काही गोष्टींचा फायदा समाज कंटकांना होतो त्यामुळे कायद्या बरोबर ठोकल्याशिवाय पर्याय नाही असंच आता काही चित्र दिसू लागला आहे. त्यामुळे साहेब आता हातातली काठी शोभेला न ठेवता तिचा योग्य त्या ठिकाणी वापर करावा अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होऊ लागली आहे.
कारण गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांनाही याचा मोठा त्रास होत आहे. अनेक मिरवणुका त्यात वाजणारे डीजे आणि कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पोलीस जीवाचं रान करून रात्रंदिवस कष्ट घेतात मात्र छोटयाश्या भांडणामुळे पुन्हा कायदा सुव्यवस्था बिघडली जाते त्यामुळे पोलिसांनी आता कायद्या बरोबर काठ्यांच्या योग्य तो वापर करावाच तरच शांतता खऱ्या अर्थाने प्रस्थापित होईल.
कुठे काही घटना घडली कीं पोलीस त्या ठिकाणी जातात शांतता प्रस्थपित करतात आणि पोलीस ठाण्यात पोहचत नाही तोच दुसरी घटना घडलेली असते. येवढे धारिष्ट्य या लोकांमध्ये येते कुठून कायद्याचा धाक संपला की झुंडशाही पोलिसांना घाबरत नाही नेमकं काय होतंय हे समजण्यापलीकडे झालंय.पोलिसांना आपला धाक जमवायलाच हवा अन्यथा पुढील काळात पोलीस फक्त बंदोबस्त करतानाच दिसतील त्यामुळे पोलिसांनी आता सिंघम स्टाईलने समाजकंटकवांचा बंदोबस्त करावा अशी मागणी सर्वसामान्य जनता करीत आहे.