अहमदनगर दि.२५ एप्रिल
अहमदनगर शहरातील डॉक्टर राहुल पंडित यांच्या नवीन घराचे काम साईनगर भोसले आखाडा या ठिकाणी सुरू होते या नवीन घरात लावण्यासाठी त्यांनी पाच वातानुकूलित यंत्र (AC) खरेदी केले होते. हे वातानुकूलित यंत्र (ए. सी.) त्यांच्या नवीन घरात ठेवले असताना चोरट्यांनी पाच पैकी दोन वातानुकूलित यंत्र (ए. सी.)चोरून नेल्याची घटना 22 एप्रिल च्या रात्री घडली होती. याप्रकरणी डॉक्टर राहुल पंडित यांच्या तक्रारीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाच्या टीमने सापळा रचून प्रवेश भापकर काळे याला पकडले होते. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने डॉक्टर राहुल पंडित यांच्या घरातूनं एक लाख वीस हजाराचे दोन वातानुकूलित यंत्र चोरले असल्याचे कबुली दिली .गुन्हयातील दोन्ही नविन वातानुकूलित यंत्र( ए.सी ) चोरट्या कडून हस्तगत करण्यात आली आहेत.
सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव पोसई मनोज कचरे, पोलीस अंमलदार देवराम ढगे, तनविर शेख, गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, अब्दुलकादर इनामदार, योगेश खामकर, संदिप थोरात, अमोल गाडे, सुजय हिवाळे, कैलास शिरसाठ, सोमनाथ राऊत, सागर मिसाळ यांच्या पथकाने केली आहे.