Home क्राईम इमरान कुरेशी उर्फ मुल्ला कटरचा कारनामा वेश्याव्यवसाय करिता मुलीची विक्री, पीडित मुलीची...

इमरान कुरेशी उर्फ मुल्ला कटरचा कारनामा वेश्याव्यवसाय करिता मुलीची विक्री, पीडित मुलीची शेवगाव येथील कुंटनखान्यातून सुटका.पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांची कारवाई

श्रीरामपूर दि.१ ऑगस्ट

श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर 2 येथे राहणाऱ्या इमरान कुरेशी उर्फ मुल्ला कटर याचे विरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे भा.द.वि कलम 363,366,376(2)(n) सह पोक्सो अधिनियम 2012 चे कलम 3,4,5(j)(ii),(L)(Q),अ.जा.ज.अधि.प्र. का.क 3(1) (W) (i),(ii) प्रमाणे दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास श्रीरामपूरचे उपअधीक्षक संदीप मिटके यांचेकडे होता.या गुन्ह्याचा तपास करत असताना इमरान कुरेशी उर्फ मुल्ला कटर आणि त्याच्या साथीदारांनी वेश्याव्यवसाय करिता एका पीडित मुलीची शेवगाव येथे कुंटणखान्यात विक्री केल्याचे निष्पन्न झाल्या नंतर त्या गुन्ह्याचे गांभीर्य व संवेदनशीलता ओळखून वेश्यव्यवसाय करिता विक्री केलेल्या पीडित मुलीची शेवगाव येथील कुंटनखान्यातून पोलीस पथकाने सुटका केली.

पीडित मुलीने या बाबत फिर्याद दिली असून त्या नुसार एक महिलेसह,सचिन (पूर्ण नाव माहीत नाही),पप्पू उर्फ प्रशांत गोरे,इमरान कुरेशी उर्फ मुल्ला कटर बाबा चंडवाल यांचे विरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात भा.द.वि.कलम 366 अ 368,370(4),370 (अ),(1),372,373,376(n) सह बाल लैंगिक आत्याचर प्रतिबंध अधिनियम कलम 3,4,5 (g),6,17 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांचे मार्गदर्शनाखाली ,Dysp संदीप मिटके ,PI संजय सानप, महिला व बाल विकास संरक्षण अधिकारी विकास बागूल, Pc,राहुल नरवडे, गौतम लगड,Lpc,राधा टोपे आदींनी केली.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version