अहमदनगर दिनांक 2 मार्च
अहमदनगर शहराचे नामांतर अहमदनगर बदलून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असे करण्याचा महानगरपालिकेचा सर्वसाधारण सभेचा ठराव महापालिका प्रशासनाने नगरसचिव विभागाकडे दिला आहे त्याचबरोबर अहमदनगर शहरातील मुख्य पोस्ट ऑफिस आणि मुख्य रेल्वे स्टेशन यांचे ना हरकत प्रमाणपत्र ही नगर विकास खात्याकडे देण्यात आले आहे त्यामुळे आता अहमदनगर शहराचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर होण्याबाबतचा मार्ग मोकळा झाला आहे.
चौंडी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी “पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर” झाल्याची घोषणा केली होती.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या 298 व्या जयंती सोहळ्यात बोलताना मुख्यमंत्र्यांनी याबाबत घोषणा केली .