HomeUncategorizedठरल तर मग नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात तुतारी घेऊन उतरणार महाविकास आघाडी...

ठरल तर मग नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात तुतारी घेऊन उतरणार महाविकास आघाडी तर्फे “हा” उमेदवार त्या फेसबुक पेज वरून 48 उमेदवारांची यादी व्हायरल… नगर दक्षिण मधून भाजप विरुद्ध ठरला “हा” उमेदवार…

advertisement

अहमदनगर दिनांक 3 फेब्रुवारी
लोकसभेची निवडणूक आता काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांमध्ये या निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरू आहे. तसेच येणाऱ्या निवडणुकीत निवडणूक जिंकण्यासाठी आराखडे बांधणीलाही आता सुरुवात झाली आहे. पक्षात उमेदवारीसाठी सुरू असलेली रस्सीखेच आणि विविध विकास कामांचे शुभारंभ या मुळे सध्या राजकीय धुराळा उडाला आहे.


अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातही सध्या लोकसभा निवडणुकीसाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे. सध्या हा मतदारसंघ भाजपकडे असला तरी विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांच्यासमोर पक्षातूनच अनेक आव्हाने उभी ठाकली आहेत. भाजपकडून विधानपरिषदेचे आमदार राम शिंदे, माजी जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यांनी लोकसभेसाठी आपल्याला तिकीट मिळावे अशी इच्छा प्रकट केली आहे. तर भाजपच्या उमेदवारासमोर कोण उभे राहणार याबाबत तर्क वितर्क सुरू आहेत. नगर पारनेर मतदारसंघाचे आमदार निलेश लंके यांनी शिवपुत्र संभाजी महाराज हे महानाट्य आयोजित करून खासदारकीसाठी फिल्डिंग लावल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोरात सुरू आहे. आमदार निलेश लंके यांच्या विविध विकास कामांच्या फ्लेक्स बोर्ड वर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचेही फोटो झळकत असल्यामुळे आमदार निलेश लंके यांची भूमिका अद्यापही गुलदस्त्यात आहे.

शिवपुत्र संभाजी महाराज या महानाट्याच्या शुभारंभाला महायुतीतील नेते आणि पदाधिकाऱ्यांची गैरहजारी तर महाविकास आघाडीतील पदाधिकारी आणि नेत्यांची हजेरी लावल्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत लंके हे लोकसभेचे उमेदवार असतील अशी चर्चा सुरू असतानाच फेसबुक वर असणाऱ्या एका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पेजवरून महाराष्ट्रातील 48 लोकसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये अहमदनगर दक्षिण मध्ये निलेश लंके यांचे नाव आल्यामुळे आता राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली असून भाजपच्या विरोधात तुतारी घेऊन आमदार लंके अथवा त्यांच्या पत्नी रणीताई लंके लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत का असा अंदाज लावला जाऊ लागला आहे. मात्र हे पेज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत पेज नसल्याचा खुलासा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे मात्र ही यादी व्हायरल होत असून या यादीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे.

एकीकडे आमदार निलेश लंके हे महाराष्ट्रातील राजकारणात राष्ट्रवादीमध्ये झालेल्या दुफळीत अजित पवार यांच्यासोबत गेलेले आहेत मात्र त्यांचे शरद पवार यांच्या बद्दलची निष्ठा आणि जवळीक पाहता आमदार निलेश लंके ऐनवेळी वेगळा निर्णय घेऊ शकतात हे अनेक जणांना वाटत असल्यामुळे निलेश लंके विरुद्ध भाजपमधील उमेदवार अशीच लढत होण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular