Homeशहरचायना मांजा....नगर मध्ये बंदी असलेल्या जीवघेण्या चायना मंजाची विक्री... महापालिका नेहमीप्रमाणे कारवाईचे...

चायना मांजा….नगर मध्ये बंदी असलेल्या जीवघेण्या चायना मंजाची विक्री… महापालिका नेहमीप्रमाणे कारवाईचे नाटक करणार का ?

advertisement

अहमदनगर दि.२५ डिसेंबर

नवीन वर्षाची चाहूल लागतात तरुणांमध्ये आणि शालेय विद्यार्थ्यांप्रमाणेच वयोवृद्धांनाही उत्सुकता लागते ती संक्रांतीला येणाऱ्या पतंग उत्सवाची. अहमदनगर शहरात संक्रांतीच्या निमित्ताने ठिकठिकाणी पतंगबाजी करण्यात येत असते डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासूनच आकाशात विविध प्रकारचे पतंग आपल्याला पाहायला मिळतात. मात्र काही काळापासून या पतंगबाजीच्या उत्सवात चायना म्हणजेच नायलॉन धागा असलेला मांजा आल्याने हा उत्सव जीवघेणा ठरू लागला आहे. चायना मांजा वर बंदी असतानाही हा मांजा नगर शहरात सर्रास विकला जातोय.

महानगरपालिका प्रशासन आणि पोलीस चायना मांजा विक्रीवर प्रतिबंध यावा यासाठी कारवाई करतात मात्र ही कारवाईक त्रोटक असल्यामुळे चायना मांजा विक्री करणाऱ्यांचे फावले जाते. चायना मांजा विक्री करणाऱ्या व्यवसायिकांचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले असून सोशल मीडियावर असलेल्या व्हाट्सअप स्टेटस आणि इंस्टाग्राम, फेसबुक यांच्या माध्यमातून आपल्याकडे कोणता मांजा आलेला आहे याची माहिती विक्री करणारे व्यावसायिक मांजा घेणाऱ्या ग्राहकांना देत असतात आणि काही ठराविक कोड वर्ड वरून हा मांजा देवाण-घेवाण होत असल्यामुळे पोलीस आणि महापालिका प्रशासनाल कारवाई करण्याबाबत मर्यादा येतात.

मात्र ज्या ठिकाणावर हा मांजा येत असतो त्या ठिकाणी छापा टाकला तर मोठ्या प्रमाणात चायना मांजाचा साठा मिळू शकतो हा मांजा अहमदनगर शहरात ट्रॅव्हल बस आणि मालवाहतूक करणाऱ्या मोठ्या वाहनांच्या माध्यमातून नगर शहरात लाखो बंडल येत आहेत या ठिकाणी छापा टाकला तर मोठ्या प्रमाणात चायना मांजा मिळू शकतो त्यामुळे या जीवघेण्या मांजामुळे कोणाचा जीव जाण्यापेक्षा आधीच यावर प्रतिबंध आणणे गरजेचे आहे तसेच मनुष्यसह प्राणी, पशु पक्षांनाही हा चायना मांजा घातक असल्यामुळे आपल्या घरात हा मांजा येणारच नाही याची काळजी ही प्रत्येक पालकांनी घेणे गरजेचे आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular