Home शहर अहमदनगर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आयोजित केलेल्या सदभावना चषक फुटबॉल आणि व्हॉलीबॉल...

अहमदनगर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आयोजित केलेल्या सदभावना चषक फुटबॉल आणि व्हॉलीबॉल स्पर्धेचा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

अहमदनगर दि.१५ जून
अहमदनगर जिल्हा पोलिस दलातर्फे आयोजित करण्यात आलेल्या सदभावना चषक फुटबॉल आणि व्हॉलीबॉल स्पर्धेचा शुभारंभ बुधवारी जिल्हा मुख्यालयाच्या पोलीस परेड ग्राउंड वर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

१५ जून ते १८ जून दरम्यान या सामन्यांचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धे साठी ११ फुटबॉल संघ तर १६ हॉलीबॉल संघांनी सहभाग घेतला आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या उपस्थितीत अपर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अगरवाल यांच्या हस्ते नाणेफेक करून सामन्याचा शुभारंभ करण्यात आला.सुथो

व्हॅलीबॉल स्पर्धेत आर्मी,फहराण मुकुंदनगर,लाईन बाँईज,कोपरगाव,राहुरी स्पायकर,वैद्य कॉलनी, अरणगाव,कोपरगाव A,सुथोउदयनदादा युवा मंच,लाईन बाँईज A,पंचपीर चावडी,किल्ला ग्राउंड,सहकार,S T महामंडळ,फ्रेंड क्लब,अहमदनगर जिल्हा पोलीस या संघांनी सहभाग घेतला आहे तर

फुटबॉल स्पर्धेत फिरोदिया शिवाजींयन्स स्पोर्ट क्लब,पार्थ योद्धा,गुलमोहर स्पोर्ट्स क्लब (बी),सुमन उद्योजक,बाटा फुटबॉल क्लबसुथो अहमदनगर पोलिस लाइन बॉईज,जेएफसी,फिरोदिया शिवाजीन्स अकादमी,गुलमोहर स्पोर्ट्स क्लब (ए),युनिटी फुटबॉल क्लब,सिटी स्पोर्ट्स क्लब,ORTS क्लब संघांनी सहभाग घेतला आहे १८ जून रोजी या दोन्ही स्पर्धेचा अंतिम सामना सायंकाळी पाच वाजता होणार असून प्रेक्षकांना या दोन दिवसात अत्यंत आटातटीचे सामने पाहायला मिळणार आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version