Home शहर १८ जून पासून आमदार चषक बास्केटबॉल स्पर्धा सावेडी मधील जॉगिंग ट्रॅक वरील...

१८ जून पासून आमदार चषक बास्केटबॉल स्पर्धा सावेडी मधील जॉगिंग ट्रॅक वरील बास्केटबॉल मैदानावर रंगणार थरार

अहमदनगर दि.१५ जून
कै. सुनील मगर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आमदार चषक बास्केटबॉल स्पर्धेचा शुभारंभ १८ जून रोजी आमदार संग्राम जगताप यांच्या ,हस्ते अहमदनगर शहरातील प्रोफेसर कॉलनी जवळील जॉगिंग ट्रॅक वर होणार असल्याची माहिती माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे विधानसभा शहराध्यक्ष सुमित कुलकर्णी आणि राष्ट्रवादी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र भांडवलकर यांनी दिले आहे.

अहमदनगर जिल्हा बास्केटबॉल संघटना तसेच अजिंक्य युवा प्रतिष्ठान, केसरी सोशल फाउंडेशन, शिवमुद्रा ग्रुप व एसबीसी बास्केटबॉल क्लब यांच्या संयुक्त विद्यमानाने कै. सुनील मगर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आमदार चषक बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन दिनांक १८ जून ते १९ जून दरम्यान सावेडी येथील जॉगिंग ट्रॅक वर करण्यात आले आहे. सुमारे १८ संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होणार असून या स्पर्धेचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत कैलास शानबाग, संजय ढोणे, वेदपाल तन्वर, प्रा, सुनील जाधव,डॉ. भूषण अनभुले ,शिवाजीत डोके,केतन क्षीरसागर ,श्‍याम सानप ,सत्येन देवळालीकर, संजय वायकर ,ओमसिंग बायस, सचिन भापकर ,दिनेश भाटिया यांच्या उपस्थितीत होणार आहे.

सावेडी परिसरातील प्रोफेसर कॉलनी जवळील जॉगिंग ट्रॅकवर भव्य असे बास्केटबॉल मैदान आमदार संग्राम जगताप यांच्या निधीतून उभा करण्यात आले आहे. या मैदानावर पहिलीच स्पर्धा होणार असून खेळाडूंनी स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी उपस्थित रहावे असे आवाहन अजिंक्य बोरकर, समीर कुलकर्णी ,गजेंद्र भांडवलकर तसेच अहमदनगर बास्केटबॉल संघटना एसबीसी बास्केटबॉल संघटना यांच्या वतीने करण्यात आले आहे. या स्पर्धेचे मीडिया पार्टनर म्हणून आवाज महाराष्ट्राचा वेब पोर्टलचे सहकार्य राहणार आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version