Home क्राईम नगर मध्ये 24 तासात दोन पोलीस लाच लुचपतच्या जाळ्यात

नगर मध्ये 24 तासात दोन पोलीस लाच लुचपतच्या जाळ्यात

 

शेवगाव दि.३ ऑगस्ट

नगर शहरातील तोफखाना पोलीस स्टेशन मधील एक कर्मचारी आपल्या पंटरकरवी लाच घेत असताना नाशिकच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले होते. या घटनेला २४  तास होत नाही तोच आता पुन्हा अहमदनगर जिल्हा पोलीस दलातील शेवगाव  पोलीस उपअधीक्षक कार्यालयातील पोलीस कर्मचारी संजय बडे याला ४०  हजारांची लाच मागितल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आहे .

या दोन सलग झालेल्या कारवाईमुळे पोलीस दलाची प्रतिमा खराब होत आहे. एकीकडे पोलीस अधीक्षक मनोज पाटील हे पारदर्शक कारभार करत असताना गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी अनेक टोळ्यांना हद्दपार केले आहे. तसेच अनेक गुंडांना तडीपार केले आहे. मात्र बोटावर मोजण्या इतके पोलीस पैशाच्या लालसेपोटी लाच घेत असल्याने पोलीस दलाची प्रतिमा खराब  होत आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version