अहमदनगर दि.१जुलै:
जिल्हा पोलिस दलातील पोलिस अंमलदारांनी
विनंती बदलीसाठी दाखल केलेले अर्ज अमान्य करण्यात आले आहेत. तसा आदेश पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी शुक्रवारी काढला. त्यामुळे विनंती बदल्यांच्या प्रतीक्षेत असलेल्यांना
पोलिस अंमलदारांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे. दरम्यान पोलिस दलातील विविध पोलिस ठाण्यातील ३५ पोलिस अंमलदारांच्या
बदल्या करण्यात आल्या आहेत.
जिल्हा पोलिस दलातील बदलीस पात्र असलेल्या पोलिस अंमलदारांची नावे पूर्वी झालेल्या प्रशासकीय बदलीत समाविष्ट नव्हती. अशा पोलिस अंमलदारांची माहिती प्रभारी पोलिस अधिकाऱ्यांकडून मागविण्यात आली होती. ही यादी जिल्हा पोलिसअस्थापना मंडळास प्राप्त झाली.त्यानुसार शहरासह जिल्ह्यातील पोलिस ठाणे, विविध विभागातील ३५ पोलिस अंमलदारांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत. तसा आदेश पोलिस अधीक्षक ओला यांनी काढला आहे. त्याचबरोबर त्यांनी विनंती बदलीसाठी प्राप्त झालेले अर्जही अमान्य करण्यात केले आहेत. पोलिस दलातील पोलिस अंमलदारांनी विनंती बदलीसाठी आस्थापनाविभागाकडे अर्ज केले होते. ते सर्व अर्ज पोलिस अधीक्षकांच्या आदेशामुळे रद्द झाले आहेत.
सोशल मीडियावर सध्या एक पोस्ट चांगलीच व्हायरल होत असून शेवगाव येथे बदली झालेल्या कर्मचाऱ्याने ती पोस्ट केली असल्याचं पोस्टवरून दिसून येतेय
काय आहे ती पोस्ट वाचा जशीच्या तशी