अहदनगर दि .१ जुलै:
सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग महाराष्ट्र शासन द्वारे सहकार मंत्री ना. अतुल सावे यांच्या निर्णयानुसार अद्यादेश काढत राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या ३० जूननंतर होणार्या निवडणुका या ३० सप्टेंबर पर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय काल जाहीर केला होता. सदर निर्णयामुळे सहकार महर्षी श्री सुवालाल गुंदेचा जैन ओसवाल नागरी सहकारी पतसंस्थेची अंतिम टप्प्यात असलेली रविवार, दिनांक २ जुलै २०२३ रोजी होऊ घातलेली मतदान व मतमोजणी प्रक्रियाबाबत संभ्रम निर्माण झाला होता. सदर निवडणुकीबाबत मंजूर निवडणूक कार्यक्रमाप्रमाणे सर्व टप्पे निहाय कामकाज होऊन उमेदवारांना चिन्ह वाटप होऊन सर्व प्रक्रिया पार पडलेली असुन मतदाना करिता शाळा उपलब्ध करणे, अधिकारी कर्मचारी यांची नियुक्ती, मतपत्रिका छपाई, पोलिस प्रशासन ची मदत घेणे व मतमोजणी ची पूर्व तयारी अश्या अनुषंगिक सर्व बाबी पूर्ण झालेली असल्याचे लेखी पत्र सहकार पॅनलच्या विनंती व मागणीनुसार निवडणूक निर्णय अधिकारी अल्ताफ शेख यांनी तातडीने दिले. सदरचे पत्र घेऊन सहकार पॅनल च्या उमेदवारांनी त्वरित हालचाली करत थेट सहकार मंत्रालय मुंबई गाठत सहकार मंत्री अतुल सावे यांना विनंती अर्ज करुन संस्थेने सदर निवडणुकीकामी खर्च वाया जाऊ नये तसेच वर नमूद सर्व बाबींचा पाठपुरावा करत संस्थेच्या होऊ घातलेल्या निवडणुका या नियोजित निवडणूक कार्यक्रम प्रमाणे घेण्याची विनंती केली. या मागणीचे निवेदन देखील सहकार पॅनलच्या वतीने तसेच सहकार पॅनल मधील विद्यमान संचालकांच्या प्रयत्नातून संस्थेच्या वतीने करण्यात आलेली असल्याने व निवडणूक प्रक्रिया पूर्ण झालेली असल्याने सहकार खात्याकडून हिरवा कंदील देत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याबाबतचे पत्र सहकार पॅनल च्या शिष्टमंडळ कडे मुंबईत मंत्रालयात सुपूर्त करण्यात आले.
यावेळी पतसंस्थेचे व्यवस्थापकीय संचालक मंडळाच्या निवडणुकीतील उमेदवार विद्यमान संचालक संतोष गांधी, अभय पितळे, शैलेश गांधी व मा. चेअरमन ईश्वर अशोक (बाबूशेठ) बोरा हजर होते. याकामी भारतीय जनता पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष तथा अहमदनगर विधानसभा प्रमुख श्री महेंद्र (भैय्या) गंधे यांचे विशेष सहकार्य लाभले.
सहकार पॅनल च्या माध्यमातून आपल्या संस्थेस आर्थिक भुर्दंड होऊ नये तसेच पुढे अतिरिक्त खर्चाचा भार संस्थेवर येऊ नये याकरिता सर्वोतोपरी प्रयत्न करत सहकार खाते व सहकार मंत्र्यांना सहकार पॅनलच्या वतीने साकडे घालण्यात आले. सहकार पॅनलच्या शिष्टमंडळाकडून सदर विषयाबाबतचे गांभीर्य सहकार मंत्र्यांना निदर्शनास आणून दिल्याने तसेच मा उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठाचे रिट पिटिशन २९२४/२०२० च्या आदेशाची प्रत दिल्याने सहकार मंत्री श्री अतुल सावे सो. यांनी त्वरित सदर बाबींची दखल घेत मतदान प्रक्रिया पुर्व नियोजित निवडणूक कार्यक्रम प्रमाणेच रविवार, दिनांक २ जुलै रोजी घेण्याचा निर्णय दिला. या प्रयत्नांना यश आल्याने सहकार पॅनलच्या सर्व उमेदवारांनी सन्माननीय सभासदांस विनंती करत उद्या दिनांक २ जुलै रविवार रोजी भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल येथे सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत होणाऱ्या मतदानात मोठ्या उत्साहाने भाग घेत नारळ चिन्ह समोर रबरी फुलीचा शिक्का मारत सहकार पॅनल च्या १२ च्या १२ उमेदवारांना तर एक जागा बिनविरोध झाल्याने संपूर्ण पॅनलचे १३ चे १३ उमेदवारांना आपले मतरुपी आशिर्वाद देत भरघोस मतांनी निवडून देण्याचे आव्हान केले.