अहमदनगर दि.२४ मे
जिल्हा पोलीस दालने उघडलेल्या विशेष मोहिमे दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील पाहिजे, फरार व अभिवचन रजेवरील एकुण ३५८ आरोपी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना यश आले आहे.
दिनांक ०९ मे, २०२२ पासुन “विशेष मोहिम” सुरू करण्यात आली होती.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाल स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे चार खास पथकांची नेमणुक करुन, दिनांक ०९ मे २०२२ ते दिनांक २२ मे २०२२ या कालावधीत पाहिजे, फरार व अभिवचन रजेवरील आरोपी विरुध्द विशेष मोहिम राबवुन जिल्ह्यातील मोक्का आरोपी ०१, फरार आरोपी -०३, बंदी फरार आरोपी -०२ व पाहिजे आरोपी ३५२ असे एकुण ३५८ आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांच्या टीमधील अधिकाऱ्यांनी केलेली कामगिरी पाहुयात
👉टीम सपोनि मुंढे यांनी एकूण पकडलेले आरोपी १०४
पाहिजे असलेल्या आरोपींची संख्या १०२ फरार आरोपी-०२
👉टीम पोसई गोरे पाहिजे आरोपी ९८ तर मोक्का आरोपी १
👉टीम सपोनि इंगळे फरार आरोपी १ पाहिजे आरोपी ९९
👉टीम सपोनि दिवटे पाहिजे आरोप ६३ असे एकूण आरोपी
३५२ पकडण्यात या टीमला यश आले आहे.
या मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार यांनी जिल्ह्यातील पाहिजे, फरार व अभिवचन रजेवरील
आरोपीचे शोध घेऊन चांगली कामगिरी केली असून सर्वात जास्त आरोपी पकडण्याची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेतील पोहेकॉ/ संदीप पवार यांनी ४४ आरोपी शोधून काढले आहेत त्या खालोखाल पोना/लक्ष्मण खोकले ४४, पोना/ज्ञानेश्वर शिंदे २०, पोहेकॉ/विजय वेठेकर १४, पोहेकों/दत्तात्रय गव्हाणे १४,सफौज/भाऊसाहेब काळे १२, पोहेकॉ/बबन मखरे ११,पोना/सुरेश माळी १०,पोना/ रवि सोनटक्के १०, या कर्मचाऱ्यांनी चांगली कामगिरी केली असून जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज कुमार पाटील यांनी साने गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांच्यासह त्यांच्या टीमचे कौतुक केले आहे.