अहमदनगर दि.२४ ऑगस्ट
प्रभारी गटविकास अधिकारी डॉ. जगदिश पालवे व ग्रामीण पाणी पुरवठा उपविभागाचे प्रभारी उपअभियंता अनिल सानप यांची खाते निहाय चौकशीच्या मागणी साठी पाथर्डी ग्रामस्थांचे जिल्हा परिषद समोर उपोषण सुरू केले आहे. ग्रामस्थांनी केलेल्या घंटानाद आंदोलनामुळे जिल्हा परिषद परिसर दणाणून गेला होता.
पाथर्डी पंचायत समितीमध्ये सध्या प्रभारी रात चालू असून यामुळे या अधिकाऱ्यांकडून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळत नाही ग्रामस्थांमध्ये पसरू लागली आहे प्रभारी अधिकारी असल्यामुळे सर्वसामान्य जनतेचे कामे होत नसून जनतेला उडवा उडवीचे उत्तरे दिले जातात त्यामुळे सर्व प्रभारी अधिकाऱ्यांच्या बदल्या करून त्यांच्या जागी कायमस्वरूपी चांगले अधिकारी द्यावेत या मागणीसाठी आणि प्रभारी गटविकास अधिकारी डॉ. जगदिश पालवे व ग्रामीण पाणी पुरवठा शेवगांव-पाथर्डी उपविभागाचे प्रभारी उपअभियंता अनिल सानप यांचा पदभार प्रभारी अधिकारी असल्यामुळे सर्वसामान्य जनतेची कामे होत नसून त्यांच्या कामकाजाची उच्चस्तरीय व खाते निहाय चौकशी करावी व त्यांच्या जागी चांगले काम करणारा अधिकारी कायमस्वरूपी नियुक्त करावा या मागणीसाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यासमोर आज पाथर्डी तालुक्यातील विविध गावातील ग्रामस्थांनी घंटानाद आंदोलनासह उपोषणाला सुरुवात केली आहे पाथर्डी तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते किसन महादेव आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू झाले आहे.