अहमदनगर दि.२ ऑक्टोबर
सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी आणि इतर काही मागण्यांच्या बाबतीत सरकारला जाग आणण्यासाठी महात्मा गांधी जयंतीच्या देणे अहमदनगर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मुंबईकडे कूच केली असून अहमदनगर महानगरपालिकेचे कर्मचाऱ्यांचे लाल वादळ हे मुंबईकडे निघाले आहे
अहमदनगर महापालिका कामगार संघटनेने महात्मा गांधी जयंतीदिनापासून नगर ते मुंबई लाँगमार्च काढण्याचा इशारा दिला होता मात्र तरीही सरकारकडून अपेक्षित काहीही उत्तर मिळाले नसून दोन दिवसांपूर्वी अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्याबरोबरही बैठक घेण्यात आली मात्र ही बैठकी निष्फळ झाल्यानंतर अखेर आज महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी नगर ते मुंबई लॉंग मार्च सुरू केला .
सातवा वेतन आयोग लागू करावा. तसेच सफाई कर्मचार्यांना वारसा हक्काचे नोकरीचे लाभ मिळावेत या मागण्यांसाठी नगर ते मंत्रालय असा लाँगमार्च सुरू झाला आहे. अहमदनगर शहरातील सिद्धार्थ नगर येथील अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून या लॉंग मार्चला सुरुवात करण्यात आली त्यानंतर दिल्लीगेट मार्गे शहरातील प्रमुख मार्गांवरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास हा अर्पण करून वाडिया पार्क येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून या लॉन्ग मार्चला सुरुवात करण्यात आली आहे जोपर्यंत सरकार आमच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत आता माघार नाही अशी भूमिका महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे