अहमदनगर दिनांक 28 नोव्हेंबर
रस्त्यावर वाढदिवस साजरा करणे ही आता फॅशन झाली आहे. सावळी उपनगर मधील गंगा उद्यान शेजारून नवीन जिल्हाधिकारी कार्यालय कडे जाणाऱ्या रोडवर दर दोन दिवसांनी वाढदिवस साजरे होत असतात. रस्त्यावरच मधोमध चार चाकी दुचाकी वाहने उभे करून केक कापून वाढदिवस साजरा करून फटाकडे फोडण्यासाठी नवीन जागा तरुणांनी सोडली आहे मात्र या तरुणांच्या कारणामुळे या रस्त्यावरून जाणाऱ्या वयोवृध्द नागरिकांना महिलांना लहान मुलांना मात्र नेहमीच त्रास सहन करावा लागतो 15 ते 20 जणांचे टोळके सतत या रोडवर उभे असते बंद गाड्यांमधून विचित्र प्रकार सुरू असतात. जर कोणी या मुलांना रोखण्यासाठी तरुणांची टोळके धावून जाण्यास आणि अरेरावी करण्यात मागेपुढे पाहत नाही.
मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास पंधरा ते वीस जणांचे टोळके दोन चार चाकी गाड्या पंधरा ते वीस दुचाकी वाहने घेऊन गंगा उद्यान शेजारी रोडवर आले एक बुलेट आणि आलिशान थार गाडी रस्त्याच्या मधोमध उभी करून वाढदिवस साजरा करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला फटाकडे फोडून आनंद उत्सव सुरू झाला आणि नंतर रस्त्याच्या मधोमध उभा राहून केक कापण्याची स्पर्धा सुरू झाली.
या बाबत तोफखाना पोलिसांना कळतात तोफखाना पोलिसांचे एक पथक तातडीने त्या ठिकाणी आल्यानंतर मात्र तरुणांची पळापळी झाली विशेष म्हणजे बरेच मुले अल्पवयीन होते मात्र या सर्व मुलांकडे चार चाकी दुचाकी वाहने होती.
पोलिसांनी आता या तरुणांना पुढील कारवाई साठी पोलीस ठाण्यात नेले आहे.मात्र असे प्रकार ठीक ठिकाणी सर्रास होत आहेत. अशा या तरुणांच्या अल्पवयीन मुलांच्य अति उत्साहामुळे नागरिकांना त्रास होतो मात्र एखादी गंभीर घटनाही या प्रकरणातून घडू शकते त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे.