Home शहर आयुक्त साहेब नगरकर नरक यातना भोगतायेत… स्वच्छ सुंदर नगर फक्त कागदावर.. मैल...

आयुक्त साहेब नगरकर नरक यातना भोगतायेत… स्वच्छ सुंदर नगर फक्त कागदावर.. मैल मिश्रित पाण्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात इकडे कधी लक्ष देणार ?

अहिल्यानगर दिनांक २० सप्टेंबर

अहिल्यानगर महानगरपालिकेला स्वच्छ शहर स्पर्धेमध्ये मानांकन मिळाले. मात्र हे मानांकन म्हणजे कागदावर स्वच्छता दाखवूनच मानांकन मिळाल्याचा आरोप आता नगरकर करत आहेत. शहरात ठिकठिकाणी कचऱ्यांचे ढीग झाले आहेत. स्वच्छतागृहांची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे. शहरात सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य साम्राज्य दिसून येत आहे. शहरात सध्या रस्त्यांची कामे सुरू असून काही कामे अर्धवट झालेली आहेत. अनेक ठिकाणी रस्ते बांधून ठेवल्यामुळे रस्त्या खालून जाणारी ड्रेनेज व्यवस्था मोडकळीस आलेली आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

Oplus_131072

नगर शहरातील डॉ. होशिंग चौक ते सबजेल कडे जाणारा रस्ता तसेच महापालिका चौकाकडे जाणारा रस्ता गेल्या एक दीड महिन्यांपासून नवीन रस्त्यासाठी खांदून ठेवला आहे. या ठिकाणी असणारी ड्रेनेज व्यवस्था अत्यंत मोडकळीस आली असून या ड्रेनेज मधून मैल मिश्रित पाणी रस्त्यावर येत असल्यामुळे या परिसरात राहणार्‍या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. रस्त्यावर मलमिश्रित पाणी आल्यामुळे त्यावर आरोग्याला घातक असणारे किडे झाले असून या प्रकाराबद्दल महानगरपालिका प्रशासनाला वेळोवेळी सांगूनही काहीही कारवाई होत नसल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत.

आम्ही आता नरकात राहतो का काय अशीच परिस्थिती या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना वाटू लागले आहे. दिवसभर घाणीचा वास आणि बाहेर जाताना येताना होणारा त्रास यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.त्यामुळे या प्रकाराकडे लवकरात लवकर लक्ष घालावे अन्यथा सर्व घाण पाणी महानगरपालिकेच्या आवारात आणून टाकली जाईल असा इशारा या परिसरातील नागरिकांनी दिला आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version