अहिल्यानगर दिनांक 19 सप्टेंबर
नवरात्र उत्सव येत्या 22 सप्टेंबर पासून सुरू होत असून नगर शहरातील भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून केडगाव येथील रेणुका माता मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. नगर शहरासह नगर जिल्ह्यातील अनेक भाविक नवरात्री निमित्ताने रेणुका देवीच्या दर्शनाला मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. केडगाव देवीला जाण्यासाठी नगर पुणे महामार्गावरून केडगाव वेशी पासून एक रोड असून दुसरा रोड रेल्वे उड्डाणपुलाच्या जवळून जातो.

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाऊस सुरू असल्यामुळे केडगाव देवी कडे जाणाऱ्या रोडवर जागोजागी रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. नवरात्रीमध्ये अनेक भाविक अनवाणी पायांनी देवी दर्शनाला येत असतात. त्यामुळे भाविकांना त्रास होऊ नये यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी महानगरपालिकेला सूचना करून त्वरित खड्डे बुजवावे अशा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने केडगाव देवी रस्त्यांच्या पॅचिंगचे कामे हाती घेतले असून या कामाचा शुभारंभ आज दत्ता खैरे, बाली बांगरे (मयूर बांगरे) सुमित लोंढे , संभाजी पवार, बच्चन कोतकर आण्णासाहेब शिंदे. सोन्याबापू घेबुड अजित दादा कोतकर विजय सुंबे , बंटी विरकर, शुभम लोंढे, गोरख लोंढे, बाला कोतकर अनिल गुंड धनेरा चव्हाण,ओंकार कापरे, सौरम सुनसुळे. आदी उपस्थित होते.