Homeविशेषबातमीचा परिणाम...तोफखाना पोलीस स्टेशन शेजारील लक्ष्मी मंदिरा समोरील बूजवलेला छोटा नाला पूर्ववत...

बातमीचा परिणाम…तोफखाना पोलीस स्टेशन शेजारील लक्ष्मी मंदिरा समोरील बूजवलेला छोटा नाला पूर्ववत सुरू…

advertisement

अहमदनगर दि.६ जुलै

सावेडी उपनगर मधील तोफखाना पोलीस स्टेशन शेजारी असलेल्या लक्ष्मी देवी मंदिराच्या बाजूने जाणाऱ्या एका छोट्या नाल्याला बुजवण्याचा कारनामा समोर आला होता विशेष म्हणजे महानगरपालिकेच्या जेसीबीच्या साह्याने हा ओढा बुजवण्यात आला आहे असा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे आता ऐन पावसाळ्याच्या तोंडावर या देवी मंदिराच्या परिसरात घाणीचे साम्राज्य साचण्याची शक्यता असल्याची बातमी मंगळवारी प्रसारित  केल्या नंतर आणि शिवसेनेचे नेते काका शेळके यांनी या बाबत मनपा प्रशासनाला धारेवर धरताच मनपा प्रशासन खडबडून जागे झाले बुधवारी सकाळीच मनपा प्रशासनाने तातडीने बुजलेला छोटा नाला पूर्ववत सुरू करून दिलाय.


या वेळी काका शेळके यांनी या ठिकाणी पाहणी करून यापुढे असे प्रकार होऊ नये म्हणून मनपा प्रशासनाने लक्ष द्यावे अशा सूचना काका शेळके यांनी महापालिका प्रशासनाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना केली.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular