Homeजिल्हाश्रीगोंद्यात भव्य हिंदू जन आक्रोश मोर्चा; लव्ह जिहाद, धर्मांतरविरोधात कायदा करण्याची मागणी

श्रीगोंद्यात भव्य हिंदू जन आक्रोश मोर्चा; लव्ह जिहाद, धर्मांतरविरोधात कायदा करण्याची मागणी

advertisement

अहमदनगर दि.५ जुलै

श्रीगोंदा येथे आज जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे मागील महिन्यात झालेल्या धर्मांत प्रकरण तसेच गोहत्या बंदी आणि कत्तलखाने बंद करावेत अशा विविध मागण्यांसाठी श्रीगोंदा सकल हिंदू समाजाच्या वतीने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते
या मोर्चासाठी भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे पिंपरी चिंचवड मतदार संघाचे आमदार महेश लांडगे आणि माजी खासदार अमर साबळे यांची प्रमुख उपस्थिती होती श्रीगोंदा शहरातील एसटी स्टँड समोरून मोर्चाची सुरुवात करण्यात आली शेकडो महिला आणि पुरुष या मोर्चात सामील झाले होते सर्वांच्या हातात भगवे ध्वज आणि शहरात ठीक ठिकाणी लागलेल्या भगव्या ध्वज या मुळे संपूर्ण श्रीगोंदा शहर भगवेमय झाले होते.


हा जन आक्रोश मोर्चा शहराच्या विविध भागातून तहसील कार्यालयावर पोहचला.विविध घोषणांनी शहर दुम दुमुन गेले होते.
तहसील कार्यालया च्या आवारात झालेल्या सभेत आमदार महेश लांडगे,आमदार नितेश राणे यांनी धर्मांतर करणाऱ्या आणि लव्ह जिहाद करणाऱ्या समाज विघातक शक्तींना यावेळी इशारा देताना सांगितले की छत्रपाती शिवाजी महाराजांनी शस्त्र आणि शत्र दोन्ही आपल्या घरात ठेवायचे सांगितले आहे आणि वेळेला शस्त्र कुठे घालायचे हे आम्हाला माहीत आहे त्यामुळे या वेळेस रिकामे आलो पुढच्या वेळेस कसे येऊ सांगू शकत नाही असा इशारा त्यांनी यावेळी बोलताना दिलाय.


या जन आक्रोश मोर्चाला अहमदनगर जिल्ह्यातील विविध भागातून मोठ्या संख्येने हिंदू बांधव आले होते.पोलिसांनी या वेळी मोठा बंदोबस्त ठेवला होता.मोर्चाच्या आयोजकांनी सर्व महिला भगिनी आणि आलेल्या कार्यकर्त्यांसाठी पाण्याची सोय केली होती.

 

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular