HomeUncategorizedमनपा अतिक्रमण विभाग झोपलेलाच पावसाळा सुरू होतोय ओढ्या नाल्यातील अतिक्रमण करून टाकलेले...

मनपा अतिक्रमण विभाग झोपलेलाच पावसाळा सुरू होतोय ओढ्या नाल्यातील अतिक्रमण करून टाकलेले सिमेंट पाईप काढण्याला मुहूर्त कधी… लोकांच्या घरात पाणी गेल्यावर ?

advertisement

अहमदनगर १७ मे

अहमदनगर शहरातील ओडे आणि नाले यांच्यामध्ये छोटे छोटे सिमेंटचे पाईप टाकून अतिक्रमण करून त्यावर मोठ मोठ्या इमारती बांधण्याचे प्रकरण अनेक ठिकाणी उघडकीस आले आहेत. याबाबत सध्या महापालिका प्रशासन आणि जिल्हाधिकारी प्रशासनाकडे कारवाई करण्यासाठी तक्रारी करण्यात आल्या असून लाल फीतीच्या कारभारामुळे या तक्रारींची फाईल फक्त या टेबलवरून त्या टेबलवर कडे जाताना चे चित्र पाहायला मिळतेआहे.या तक्रारी सुरू असताना नव्यानेच काही ओढे आणि नाले बुजवण्याचे प्रकार सुरू असून त्यामधील एक प्रकार गुलमोहर रोडवरील आनंद शाळेसमोरील नरहरी नगर परिसरातून जाणाऱ्या एका नैसर्गिक ओढ्या मध्ये सिमेंटचे पाईप टाकून अतिक्रमण करून तो ओढा बुजवण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार सुरू असतानाच नरहरी नगर मधील नागरिकांनी महानगरपालिकेकडे तक्रार केली होती मात्र महानगरपालिकेला अध्यापही हे अतिक्रमण केलेले सिमेंटचे पाईप काढून टाकण्यास मुहूर्त मिळाला नाही.

पावसाळा तोंडावर आला असून दरवर्षी पावसाळ्यात नरहरी नगर परिसरामध्ये नागरिकांच्या घरामध्ये पाणी जात असते. अनेक दुकानांमध्ये पाणी साचून दरवर्षी दुकानदारांच्या नुकसान होत असते. मात्र महानगरपालिकेकडे तक्रार करूनही महानगरपालिकेने अतिक्रमण केलेल्या ओढ्यामधील सिमेंटचे पाईप काढले नसल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. हे सिमेंटचे पाईप काढायला कधी मुहूर्त लागणार असा संतप्त सवाल नरहरीनगरमध्ये नागरिक करू लागले आहेत .पावसाळ्यात आमच्या घरात जोपर्यंत पाणी घुसत नाही तोपर्यंत महानगरपालिका अतिक्रमण विभाग जागा होणार नाही का ? असा सवालही आता नागरिक उपस्थित करू लागले आहेत.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular