Homeक्राईमअश्लील चाळे करण्यास मुभा देणाऱ्या तीन कॅफे हाऊसची तोडफोड...

अश्लील चाळे करण्यास मुभा देणाऱ्या तीन कॅफे हाऊसची तोडफोड…

advertisement

सांगली दि.१७ मे
सांगली शहरामधील कॅफेमध्ये अश्लिल चाळे होत
असल्याचा आरोप करत आज शिवप्रतिष्ठान युवा
संघटना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाली. नितीन चौगुले यांच्या नेतृत्वाखाली शहरातील विश्रामबाग रोडवरील एका कॅफे शॉपमध्ये घुसुन तोडफोड केली.

सांगली शहरातील एका कॅफे शॉपमध्ये अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध पाजून अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर शहरातील कॅफे शॉपमधील अश्लिल प्रकाराविरोधात शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तान संघटना आक्रमक झाली.या रोड वरील एकापाठोपाठ एक तीन कॅफे फोडण्यात आले.

शहरातील कॅफे शॉपमध्ये सर्रास अश्लिल चाळे
करण्यासाठी परवानगी देण्यात येत असल्याचा आरोप
शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानकडून करण्यात आला
यावेळी संस्थापक अध्यक्ष नितीन चौगुले यांच्या
नेतृत्वाखाली कॅफे शॉप विरोधात शिवप्रतिष्ठान युवाच्य
कार्यकर्त्यांनी आंदोलनही केले.

अहमदनगर शहरातील काही कॅफेंमध्ये अश्लिल चाळे होत आहेत. तसेच अल्पवयीन मुले मुले ही शाळेच्या आणि कॉलेजच्या ड्रेसवर या कॅफेमध्ये जाताना येतानाचे चित्र नेहमीच पाहायला मिळते. अहमदनगर शहरात नव्यानेच नियुक्त झालेले शहर पोलीस उपाधीक्षक अमोल भारती यांनी सुरुवातीला काही कॅफे चालकांवर कारवाई करत गुन्हे दाखल केले होते मात्र पुन्हा हे कॅफे जैसे थे चालू असून अनेक कॅफेंमध्ये पडदे लावून अश्लिल चाळे करण्याची मुभा दिली जाते त्यामुळे पोलिसांनी अशा कॅफेंवर कारवाई अशी मागणी होत आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular