Home Uncategorized महानगरपालिकेचे प्रशासक डॉक्टर पंकज जावळे यांनी पहिल्याच दिवशी घेतील सर्व विभागांची झाडाझडती.....

महानगरपालिकेचे प्रशासक डॉक्टर पंकज जावळे यांनी पहिल्याच दिवशी घेतील सर्व विभागांची झाडाझडती.. गैरहजर कर्मचारी अस्वच्छता यावर सुनावले खडे बोल

अहमदनगर दि.२९ डिसेंबर

अहमदनगर महानगरपालिकेच्या प्रशासकपदी महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांची नियुक्ती झाली असून आजपासून अहमदनगर महानगरपालिकेत प्रशासकीय राज सुरू झाले आहे. आज पहिल्याच दिवशी महानगरपालिकेचे प्रशासक डॉक्टर पंकज जावळे यांनी सर्व विभागांना भेटी देऊन पाहणी केली विविध ठिकाणी पडलेले असते दूर कचरा कर्मचारी गैरहजर याबाबत प्रसाद सक डॉक्टर पंकज जावळे यांनी विभाग प्रमुखांना जाब विचारला. त्या ठिकाणी गैरहजर असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस काढाव्यात असे फर्मान प्रशासकांनी सोडले आहे.

अहमदनगर महानगरपालिकेच्या नगरसेवकांचा कार्यकाळ 27 डिसेंबर रोजी संपल्यानंतर महानगरपालिकेच्या प्रशासक पदी कोण येणार याबाबत चांगली चर्चा रंगली होती. जिल्हाधिकारी सिताराम सालीमठ यांचे नावही प्रशासक म्हणून चर्चेत आल्यानंतर महानगरपालिकेत डॉक्टर पंकज जावळे की सिताराम सालीमठ यावर चर्चा सुरू असतानाच 28 तारखेला रात्री उशिरा नगर विकास खात्याकडून अहमदनगर महानगरपालिकेच्या प्रशासकपदी डॉक्टर पंकज जावळे यांची नियुक्ती झाल्याचे पत्र प्राप्त झाल्यानंतर सर्व चर्चा थांबल्या होत्या.

आता अहमदनगर शहराचा कारभाराचा गाडा प्रशासक म्हणून डॉक्टर पंकज जावळे हे चालवणार असून त्यांच्याकडून नगरकरांना मोठ्या अपेक्षा आहेत.
नगर शहरातील रस्ते, लाईट या प्रमुख समस्या सोडवण्याचं आव्हान प्रशासका समोर असून त्यामुळे आता एकहाती कारभार असल्यामुळे लवकरात लवकर कामे मार्गी लागतील अशी अपेक्षा नगरकरांना आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version