अहमदनगर दि.२९ डिसेंबर
अहमदनगर शहरात मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात नायलॉन चायना मांजा विक्री सुरू असून. हा मांजा नागरिकांच्या धोका निर्माण करू शकतो. या नायलॉन माझ्यामुळे अनेकांचे जीव गेलेले आहेत तसेच अनेक लहान मुले वयोवृद्ध माणसे जखमी झालेले आहेत तर दरवर्षी लाखो पशुपक्षी या चायना मांजा मुळे मृत्यूमुखी पडल्याची नोंदही झालेली आहे.त्यामुळे या मांजाच्या विक्री करणाऱ्या व्यवसायांवर दंडात्मक कारवाई करून हा नायलॉन मांजा समोर नष्ट करावा अशा मागणीचे निवेदन माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर यांनी महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांना दिले आहे.
यावर प्रशासक तथा आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी एक जानेवारी रोजी तातडीने सर्व पर्यावरण रक्षक आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली असून एक पथक स्थापन करून चायना मांजा विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याबाबत या बैठकीत निर्देश देणार असल्याचे डॉक्टर पंकज जावळे यांनी सांगितले आहे. तसेच चायना मांजा विकत घेण्यापासून पालकांनी आपल्या पाल्यांना प्रवृत्त करावे आणि लोकसहभाग वाढवण्याची गरज असल्याचे डॉक्टर पंकज जावळे यांनी सांगितले