Home राजकारण Election: मुकुंदनगरची राजकीय नस पुन्हा धडधडू लागली…सर्वाधिक चुरशीचा प्रभाग चार पुन्हा...

Election: मुकुंदनगरची राजकीय नस पुन्हा धडधडू लागली…सर्वाधिक चुरशीचा प्रभाग चार पुन्हा चर्चेत : हाय-व्होल्टेज रणांगणातील अटीतटीची लढत..एम आय एम पक्षाचा जोर वाढला…

अहिल्यानगर दिनांक 13 जानेवारी

अहिल्यानगर महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक चार नगरच्या राजकारणात कायम चर्चेत असलेला, निवडणुकीत पार्टी स्पीड वेगळ्याच उंचीवर नेणारा हा प्रभाग दर पाच वर्षांनी राजकीय झोका या प्रभागाने अनुभवलेला आहे.

Oplus_131072

मुकुंदनगरची प्रत्येकवेळी चुरशीची, हाय-व्होल्टेज लढत ठरलेलीच. यावेळी मुकूंद नगर मध्ये समद खान यांनी राष्ट्रवादी सोडून एमआयएमची पतंग हातात धरल्यामुळे या ठिकाणी एमआयएम विरुद्ध काँग्रेस अशी थेट आणि जोरदार चुरस रंगली आहे.

हाय-व्होल्टेज रणांगणातील ही अटीतटीची लढत महापालिका क्षेत्रात लक्षवेधी ठरत आहे.मात्र यात कामाच्या जोरावर समद खान यांनी जोरदार आघाडी घेतली असून प्रचारातही त्यांनी आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. समद खान यांनी प्रचारात आघाडी घेताना प्रभागात केलेल्या कामांचे मुद्दे प्रामुख्याने मतदारांसमोर मांडले आहेत विकास काम केल्यामुळे कोणीही त्यांनी केलेल्या कामाला ना करू शकत नाही हाच मुद्दा एमआय पक्षाला प्रचारात आघाडी मिळवून देण्याचा ठरला आहे.

प्रभाग क्रमांक चार मध्ये एमआयएम कडून अ मध्ये शेख शहबाज खालिद , ब मध्ये सय्यद शहबाज अहमद क मध्ये शेख सलमा जाकीर यांच्यासह द मध्ये समद खान यांचा भक्कम पॅनल असून.
या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे एमआयएम कडून उतरलेले उमेदवार हे केवळ पक्षाचे चेहरे नसून, स्थानिक राजकारणाचा वारसा आणि अनुभव घेऊन आलेले आहेत.

अनुभव, नाती, संघटन, स्थानिक प्रभाव

एम आय एम चे उमेदवार समद खान हे नगरसेवक असल्यामुळे त्यांना महानगरपालिकेच्या कामाचा अत्यंत चांगला अनुभव आहे आणि महानगरपालिकेकडून काम कसे करून घ्यायचा याचा हातखंडा समद खान यांना असल्यामुळे त्यामुळे प्रभाग क्रमांक चार ची लढत केवळ पक्षीय नसून, अनुभव, नाती, संघटन आणि स्थानिक प्रभाव यांचीही आहे.

बांधणी अनेक वर्षे; निकाल एका दिवसाचा
या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमआयएमच्या पॅनेल्सच्या नेत्यांनी गेल्या वर्षभरात निवडणुकीचे सूक्ष्म नियोजन केले. बूथनिहाय बांधणी, मतदार संपर्क, सामाजिक समीकरणे आणि स्थानिक प्रश्न, कामे यांच्याभोवती प्रचाराची दिशा ठरवण्यात आली होती त्यामुळे एम आमच्या उमेदवारांना ही निवडणूक सोपी झालेली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version